Hair Care | पातळ आणि निर्जीव केसांना निरोगी बनवण्यासाठी या आयुर्वेदिक टिप्स फाॅलो करा!
सध्याच्या हंगामामध्ये केसांची (Hair) काळजी घेणे खूप जास्त महत्वाचे आहे. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आयुर्वेदाची (Ayurveda) मदत घेऊ शकता. कारण याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की, पदार्थाचा संबंध वाताशी, पित्ताचा संबंध अग्नीशी आणि कफाचा संबंध पाण्याशी आहे. यापैकी कोणत्याही दोषामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.
केसांची काळजी घेण्यासाठी या टिप्स फाॅलो करा.
Image Credit source: TV9
Follow us on
मुंबई : सध्याच्या हंगामामध्ये केसांची (Hair) काळजी घेणे खूप जास्त महत्वाचे आहे. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आयुर्वेदाची (Ayurveda) मदत घेऊ शकता. कारण याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की, पदार्थाचा संबंध वाताशी, पित्ताचा संबंध अग्नीशी आणि कफाचा संबंध पाण्याशी आहे. यापैकी कोणत्याही दोषामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात आयुर्वेद टिप्स खास आपले केस सुंदर (Beautiful hair) ठेवण्यासाठी. विशेष म्हणजे या टिप्स जर आपण फाॅलो केल्यातर आपल्या केसांशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
आयुर्वेदानुसार तेल केसांना चांगले पोषण देते तसेच केसांना मॉइश्चरायझ करते. तुम्हाला बाजारात अनेक आयुर्वेदिक तेल मिळतील. ज्यातून उत्तम परिणाम मिळू शकतात. शक्यतो तेल हे केसांना गरम करूनच लावावे. कारण गरम तेल लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात. मात्र, तेल जास्त गरम नको तर नेहमीच कोमट असावे.
फक्त तेल लावून केसांना पोषण मिळू शकत नाही. केसांना शरीराच्या आतून चांगले पोषण मिळणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार योग्य आहाराचे पालन केल्याने केसांची वाढ योग्य होते. फळे, भाज्या आणि इतर गोष्टींचा आहारात समावेश करा. हिरव्या भाज्यांमध्ये पालक, दुधी भोपळा खाऊन तुम्ही आतून निरोगी राहू शकता.
बाजारात अनेक प्रकारचे हर्बल हेअर केअर प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत,.जे तुम्हाला उत्तम रिझल्ट देऊ शकतात. आयुर्वेदात रिठा आणि शिककाई या वनस्पतींना कोमट पाण्यात मिसळून साबण किंवा शैम्पू बनवले जातात. ज्याला तुम्ही केसांच्या निगा राखण्याचा एक भाग बनवू शकता. हे केल्याने आपले केस सुंदर होण्यास नक्कीच मदत होते.
आठवड्यातून एकदा तरी केसांना तेलाने मसाज करणे आवश्यक आहे. हर्बल तेल घेऊन ते गरम करून केसांना लावावे. आता हलक्या हातांनी 10 मिनिटे मसाज करा. यामुळे केसांची वाढ होईल आणि ते चमकदारही होतील. हर्बल तेल गरम करून केसांना मसाज केल्याने रक्ताभिसरणही सुधारण्यासही मदत होते.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)