मुंबई : चेहऱ्याच्या सौंदर्यात केसांची भूमिका महत्त्वाची असते. पण आजच्या काळात मुली स्मार्ट लूक देण्यासाठी रिबॉन्डिंग आणि स्मूथिंगच्या नावाखाली केमिकल असलेली उत्पादने वापरतात, केसांना रंग देऊन केस हायलाइट करतात आणि हीटिंग टूल्सचा अधिक वापर करतात. त्यामुळे केस अधिक खराब होतात. अशा परिस्थितीत केस झपाट्याने गळू लागतात, कमकुवत होतात आणि तुटतात.
तुम्हालाही अशी काही समस्या असल्यास नारळाचे तेल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. नारळ तेलामध्ये बुरशीविरोधी, अँटी-बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि फॅटी अॅसिड गुणधर्म असतात. जर नारळाच्या तेलात काही घटक मिक्स केले तर केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते.
नारळ तेल आणि मध
दोन चमचे नारळ तेल घेऊन गरम करा. त्यात मध मिसळा आणि हे तेल केसांना लावा. साधारण अर्धा तास तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. नारळ आणि मध यांचे मिश्रण केसांना मऊ करते आणि चमक आणते.
नारळ तेल आणि केळी
केसांची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी केळी फायदेशीर आहे. अर्धी केळी नारळ तेलात मिसळून हेअर पॅकप्रमाणे केसांना लावल्यास केसांची गुणवत्ता सुधारते. केस फुटण्याची समस्या दूर होते. हा पॅक केसांना सुमारे 30 मिनिटे लावा आणि केस धुवा.
नारळ तेल आणि लिंबू
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी सोबत अँटीफंगल गुणधर्म असतात. हे टाळू स्वच्छ करते आणि केसांची चांगली वाढ करण्यास मदत करते. कोंड्याची समस्या दूर करते. नारळ तेलामध्ये लिंबू मिक्स करा आणि केसांना लावा. यामुळे कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
केस मऊ ठेवण्यासाठी खास उपाय-
शॅम्पूसह अनेक केसांची निगा राखणाऱ्या उत्पादनांमध्ये असलेले केमिकल अंततः केसांचे नुकसान करते. कारण त्यात जास्त प्रमाणात रसायने असतात. त्यांच्या अत्यधिक वापरामुळे, केसांमध्ये नैसर्गिक ओलावा नष्ट होतो आणि ते निर्जीव तसेच गुंतलेले दिसतात. ही समस्या विशेषतः आर्द्र वातावरणात निर्माण होते. या समस्येतून मुक्त होण्यासाठी ओल्या केसांमध्ये नारळ तेलाचे काही थेंब घाला. असे केल्याने हा ओलावा केसांमध्येच टिकून राहतो आणि केस मऊ होतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!