मुंबई : उन्हाळ्यात (Summer) कडक सूर्यप्रकाश, प्रदूषण आणि टाळूच्या घामामुळे केसांचे खूप नुकसान होते. यामुळे केस कोरडे होऊ लागतात. केस गळण्याची आणि तुटण्याची समस्या जास्त प्रमाणात निर्माण होते. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक सौंदर्य उत्पादने (Beauty products) वापरतात. बाहेरील सौंदर्य तुमच्या केसांचे खूप नुकसान करतात. अशा परिस्थितीत तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता. ते टाळूची खाज दूर करतील, केस निरोगी ठेवण्यास मदत करतील. केस (Hair) निरोगी ठेवण्यासाठी नेमके कोणते घरगुती उपाय करायचे याबद्दस सविस्करपणे जाणून घेऊयात.
तुम्ही केसांवर खोबरेल तेल वापरू शकता. गरम तेलाने केसांना मसाज करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. रात्रभर असेच राहू द्या, नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी धुवा, तुम्ही खोबरेल तेलाव्यतिरिक्त ऑलिव्ह ऑईल किंवा जोजोबा तेल वापरू शकता. तुम्ही हे आठवड्यातून 2 वेळा वापरू शकता. यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.
निरोगी केसांसाठी तुम्ही होममेड हेअर मास्क देखील वापरू शकता. प्रथम एक लहान वाटी घ्या आणि त्यात एक अंडे फोडा. एका भांड्यात एक चमचा दही मिसळा, त्यात एक चमचा मध घाला आणि चांगले मिसळा. ते टाळूवर आणि केसांवर लावा. त्यानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा. यामुळे आपल्या केस गळतीची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल.
हेअरपॅक बनवण्यासाठी एका वाटीमध्ये तीन अंड्याचा पांढरा भाग घ्या, त्यात अॅपल सायडर व्हिनेगर आणि ऑलिव्ह ऑइल घाला. ते चांगले मिसळा आणि टाळूवर आणि केसांवर लावा. अर्धा तास तसंच राहू द्या, नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. या हेअरपॅकमुळे केस गळतीची समस्या झटपट कमी होण्यास मदत होईल.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
झिरो फिगरसाठी तुमच्या डाएटमध्ये ‘या’ सुपरफूडचा नक्की समावेश करा…