मुंबई : केस गळणं (hair fall), त्यांचं निस्तेज होणं, वाढ खुंटणं या खूप महिलांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत. याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण त्यामुळे तुमचे केस अधिकच निस्तेज होऊ लागतील त्यामुळे तुम्ही काही घरगुती उपाय करा आणि केसांचं आरोग्य सुदृढ राखा… मजबूत केसांसाठी चांगला आहार (Healthy diet) घेणं खूप महत्त्वाचा आहे. पुरेशा प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह आणि झिंक, अंडी, दही आणि चीज यांसारख्या पदार्थांमध्ये आढळते. रोज एक वाटी कोंब खा. त्यात अमिनो अॅसिड असते. हे केस निरोगी ठेवण्यास मदत करते. हे पोषक केसांना खोलवर पोषण देण्याचे काम करतात. यामुळे तुमचे केस मजबूत आणि चमकदार बनतील.
गरम तेल मालिश
केसांच्या वाढीसाठी गरम तेलाचा मसाज आवश्यक आहे. केसांना गरम तेलाने मसाज केल्याने केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण वाढते. केसांना खूप वेगाने मसाज करणे टाळा. केसांना आणि त्वचेला कोमट तेल लावा. हलक्या हाताने मसाज करा. तेलांचे स्वतःचे विशेष गुणधर्म आणि फायदे आहेत. या तेलामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते. तेल लावल्यानंतर गरम पाण्यात टॉवेल बुडवा. पाणी पिळून घ्या आणि डोक्याला टॉवेल गुंडाळा. 5 मिनिटं तसंच राहू द्या. याने तुमचे केस मजबूत आणि चमकदार होतील.
केस किती वेळा धुवावेत
तेलकट केस आठवड्यातून 3 वेळा आणि कोरडे केस 2 वेळा धुवावेत. केस धुण्यासाठी हर्बल शैम्पू वापरा. केस पाण्याने चांगले धुवा. शॅम्पू केल्यानंतर केस टॉवेलने झटकणे टाळा. काही मिनिटांसाठी टॉवेल डोक्याभोवती गुंडाळा आणि ओलावा शोषून घ्या. ओल्या केसांना कंगव्याने विंचारणे टाळा. हे केसांसाठी हानिकारक आहे. केसांसाठी रुंद दातांचा कंगवा वापरा. हेअर ड्रायरचा नियमित वापर टाळा आणि शक्य तितके आपले केस नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या.
कांद्याचा रस लाभकारी
कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. कांद्याचा रस लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. त्यात सल्फर असते. केसांच्या वाढीसाठी तुम्ही कढीपत्ता देखील वापरू शकता. दक्षिण भारतात केसांची वाढ वाढवण्यासाठी कढीपत्ता वापरला जातो. कढीपत्त्याची पेस्ट दह्यात मिसळून हेअर पॅक म्हणून वापरता येते. तुम्ही ते अॅलोवेरा जेलमध्ये मिसळून केसांना लावू शकता.
संबंधित बातम्या