तुम्हारे पैरों से मेरे पैर कितने सुंदर… पायाचं सौंदर्य टिकवायचंय? या टिप्स फॉलो करा

| Updated on: Nov 13, 2024 | 5:55 PM

कधी भेगा पडलेल्या टाचा , कधी टॅन, कोरडी त्वचा तर कधी धूळ सर्व वयोगटातील महिला पायांच्या या समस्येने त्रस्त असतात. अशा वेळी पायाची योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

तुम्हारे पैरों से मेरे पैर कितने सुंदर... पायाचं सौंदर्य टिकवायचंय? या टिप्स फॉलो करा
Foot Care
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपले पाय. आपण आपल्या आरोग्याची जशी काळजी घेतो तशी आपल्या पायांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. पायांचे सौंदर्य टिकवण्यासाठी पायांची योग्य काळजी घेतली नाही तर टाचांना भेगा पडणे, , कधी टॅन, कोरडी त्वचा तर कधी धूळ बसून इन्फेकशन होऊ शकते. असे अनेक समस्या निर्माण होतात.अशा वेळी पायाची योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

प्रत्येकाला आपले पाय सुंदर दिसावे असे वाटत असते पण पायांची योग्य काळजी कशी घायची हे प्रत्येकाला नीटस माहित नसतं. ज्यामुळे योग्य काळजी घेतली जात नाही. म्हणून पायाची काळजी दररोज घेतली पाहिजे आणि ती करणे देखील खूप सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया काही फूटकेअर टिप्स, ज्यामुळे तुमचे पाय मुलायम आणि सुंदर दिसतील.

– तुम्ही जेव्हा बाहेरून जाऊन येता तेव्हा लगेच पाय धुण्याची सवय लावा. अशाने तुमच्या पायात जमा झालेली धूळ आणि माती निघून जाईल. यामुळे कोणतेही इन्फेकशन होणार नाही.

– तुमचे पाय जास्त घाण असतील तर कोमट पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे पाय टाकून बसा. या पाण्यात कोणतेही शॅम्पू किंवा बॉडी वॉश मिक्स करा. तसेच फूट क्लिंजिंग स्क्रबर आणि ब्रशच्या साहाय्याने कॅलस आणि कॉर्न सारखे घाण काढून टाका नंतर पाय स्क्रब करा. गरजेपेक्षा जास्त दाब लावून स्क्रब करू नका.

– पाय स्वच्छ धुतल्यानंतर त्यांना कॉटनच्या टॉवेलने नीट पुसून घ्या. विशेषतः प्रत्येक बोटांच्या मध्ये असलेल्या जागेमध्ये टॉवेलने पुसून घ्या. जर यामध्ये ओलेपणा राहिल्यास फंगल इन्फेक्शन होण्याची भीती असते.

– पायांना कोरडे केल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. तुमच्या कडे असणारे फूट क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावा जेणेकरून पायांचा कोरडेपणा दूर होईल, ओलावा टिकून राहील आणि टाचांमध्ये कधीही भेगा पडणार नाहीत.

– पायांची नखे वाढल्यास वेळीस कापून घ्यावी. पण लक्षात ठेवा कि नखं कापताना नेलकटर नखांच्या आतील त्वचेवर लागले नाही पाहिजे. अशाने तुमच्या बोटाला इन्ग्रोन फिंगरची समस्या निर्माण होऊ शकते. ज्याने तुम्हा खूप वेदना होऊ शकतात. नखं कापल्यानंतर पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही नेलपेंट लावू शकता. पण नेहमी नेलपेंट लावत जाऊ नका.