मुंबई : त्वचा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी आपण फळांच्या सालीपासून विविध फेस मास्क, फेसपॅक आणि फेस स्क्रब तयार करू शकतो. हे आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत चांगले आहेत, याच्यापुढे महागडे फेशियल आणि ब्रँडेड क्रीमही अपयशी ठरू शकतात. त्यातील पोषक घटक आपली त्वचा निरोगी बनवते आणि चेहर्यावर नैसर्गिक चमक देखील येते.
आपण केळीच्या सालीपासून घरी फेसपॅक तयार करू शकतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला एका केळीची साल, दोन चमचे मध, दोन चमचे हळद आणि गुलाब पाणी लागणार आहे. केळीच्या सालीची बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर साधारण वीस मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.
हा पॅक आपण आठ दिवसातून दोन वेळा आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली असतील तर ती समस्या दूर करण्यासाठी आपण केळीची साल वापरू शकतो. यासाठी केळीच्या सालीमध्ये कोरफड मिक्स करा आणि ते चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून 3 दिवस हा उपाय करून पहा. केळीची साल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.
त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आपण केळीची साल वापरू शकता. यासाठी 3 चमचे साखर, ओटचे पीठ, केळीच्या सालाची पूड घ्या. आता या तीन गोष्टी ग्राइंडरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर पाण्याने धुवा. केळ्याची साल ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. जर आपले त्वचा तेलकट असतील, तर त्यात कोरफड घालता आणि चेहऱ्याला लावा. यामुळे चेहरा चमकदार होता. आठवड्यातून 3 ते 4 वेळा ही पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Homemade face pack is beneficial for removing dark spots and pimples on the face)