मुंबई : सर्वांनाच सुंदर दिसण्याची इच्छा असते. आपली त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हालाही दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र, जर तुम्हाला कायमसाठी त्वचा चांगली पाहिजे असेल तर चला, त्वचा सुधारण्यासाठीच्या या टिप्स जाणून घेऊया. (Honey and lemon are beneficial for the skin)
लिंबू आणि मध हे नैसर्गिक ब्लीच मानले जाते, कारण त्यात नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असतात, जे चेहर्याचे रंग उजळ करण्यासाठी कार्य करतात. यामुळे आपण आपल्या चेहऱ्याला मध आणि लिंबू लावले पाहिजे. यासाठी आपण तीन चमचे लिंबाचा रस आणि दोन चमचे मध मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा.
ही पेस्ट वीस मिनिटे आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे त्वचा सुधारण्यास मदत करते. लिंबामुळे आपली त्वचा चमकदार होते. ते त्वचेवरील सुरकुत्या काढून टाकण्यास मदत करतात. लिंबू तेलकट त्वचेसाठी चांगले आहे.
हे त्वचेचे अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करते. लिंबामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे. यामुळे मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होते. लिंबू हे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. 1 कट केलेला बटाटा, 2 चमचा दूध, 3-4 थेंब ग्लिसरीन एका वाटीमध्ये हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा मग हे आपल्या चेहऱ्याला लावा आणि कमीतकमी 15-20 मिनिटे चेहऱ्यावर तसेत ठेवा.
जेव्हा ते चांगले सुकेल तेव्हा ते पाण्याने धुवा. टॉवेलने पुसून घ्या आणि मॉइश्चरायझर लावा. आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरा. ग्लिसरीनचा उपयोग आपली त्वचा मॉइश्चरायझ करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर, बटाटा आपल्या त्वचेवरील सुरकुत्या काढून टाकतो. यामुळे चेहरा ग्लो देखील करू लागतो.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Honey and lemon are beneficial for the skin)