लग्नानंतर वजन वाढण्याची अजिबात करू नका चिंता, ‘ही’ पेये ठरतील उपयोगी

| Updated on: Nov 15, 2024 | 7:32 AM

लग्नानंतर अचानक वजन का वाढू लागते हा प्रश्न अनेकांना पडतो. हे वाढलेले वजन संपूर्ण व्यक्तिमत्वाला हानी पोहोचवते आणि कधी कधी ते लाजिरवाणे देखील बनते.

लग्नानंतर वजन वाढण्याची अजिबात करू नका चिंता, ही पेये ठरतील उपयोगी
Follow us on

Weight Gain After Marriage : चुकीची जीवनशैली आणि फास्ट फूडचे अतिप्रमाणात सेवन यामुळे वजन वाढते. अनेक लोक व्यायाम करून किंवा वर्कआउट करुन तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु बहुतेक लोक लग्नानंतरही दिनचर्या मोडतात. त्याचवेळी तळलेले किंवा भाजलेले, अन्न कधीही खाण्यासारख्या वाईट सवयीमुळे देखील वजन वाढते. लग्नानंतर वजन वाढणे हे सर्वात सामान्य आहे. जास्त वजन असण्याचं मुख्य कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बदल.

वाढत्या वजनाची ही चिंता लग्नाच्याआधीच लोकांना सतावत असते. वजन योग्य ठेवण्यासाठी योग्य खाणे. निरोगी जीवनशैलीचे पालन करणे महत्त्वाचे आहे. पण काही घरगुती उपाय करुन देखील वजन नियंत्रणात ठेवता येते. अशाच काही पेयांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. जे पोटाची चरबी वितळण्यासाठी आणि चयापचय व्यवस्थित ठेवण्यासाठी उपायुक्त आहेत.

लग्नानंतर वजन का वाढते?

लग्नानंतर वजन वाढण्याची कारणे काय आहेत, असा प्रश्न अनेकांना पडतो. यामागे अनेक कारणे असू शकतात. तज्ज्ञांच्या मते हार्मोनल असंतुलनामुळे ही असे होऊ शकते. एका रिपोर्टनुसार तणाव असतो तेव्हा कोर्टीसोल नावाचा हार्मोन वाढू लागतो. ज्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात भूक लागते आणि लग्नानंतर जास्त खायला लागतो. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्या की खाण्याच्या पद्धती बदलतात. त्यामुळे वजन वाढू लागते.

वजन कमी करण्यासाठी प्या ‘ही’ पेये

ग्रीन टी : लग्नानंतर झपाट्याने वजन वाढण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी ग्रीन टी काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकते पण यासोबतच तुमची निरोगी जीवन शैली असायला हवी आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय असायला हवे. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. तज्ञांच्या मते, यामध्ये कॅटेचिन नावाचे अँटिऑक्सिडंट असते. जे वजन कमी करण्यास मदत करते.

बडीशेपची चहा : लग्नाच्या आधी किंवा नंतर कधीही बडीशेप टाकून चहा प्यायल्यास त्यातील घटक पोटातील एंजाइम सक्रिय करून आरोग्य सुधारण्यास मदत करतात.वजन कमी करण्यासाठी आपण गरम पाणी किंवा स्थानिक गोष्टींपासून बनवलेला चहा जसे की बडीशेप किंवा मेथीचे दाणे टाकून चहा प्यावी.

ओव्याचे पाणी : ओवा हा पोटासाठी रामबाण उपाय मानला जातो. जे लोक वजन कमी करत आहेत किंवा आपले वजन टिकवून ठेवू इच्छिता त्यांनी दररोज ओव्याचे पाणी प्यावे. हे चयापचय सुधारण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. आयुर्वेदामध्ये ओव्याला केवळ पोटासाठीच नाही तर संपूर्ण शरीरासाठी देखील फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

आले आणि लिंबाचे पेय : वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबापासून बनवलेले पेय देखील पिऊ शकतात. लिंबांमध्ये व्हिटॅमिन सी असते आणि आल्यामध्ये अनेक घटक असतात जे चयापचय वाढवतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)