मुंबई : आजकालच्या धकाधकीच्या युगात नोकरी, संसार, कुटुंबाची जबाबदारी यातून स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही. इंटरनेटचे जग नक्कीच लोकांना खूप वेगाने पुढे नेत आहे, परंतु त्यामुळे लोकांकडे स्वतःला थोडा वेळ देण्यासाठी पुरेसा वेळ नाही. संपूर्ण दिवस नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये जातो. त्याचबरोबर लोकांचे खानपानही इतके खराब झाले आहे की त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि त्वचेवर दिसू लागला आहे. यामुळेच आजकाल वयाच्या 35 व्या वर्षीच चेहऱ्याचे सौंदर्य कमी होऊ लागते. त्वचेवर सुरकुत्या आणि वयाचा परिणाम वेळेआधीच दिसू लागतो आणि चेहरा निस्तेज होऊ लागतो. स्त्रिया देखील चेहरा सुंदर करण्यासाठी अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतात, परंतु कुठेतरी त्याचे दुष्परिणाम देखील समोर येतात आणि त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य गमावू लागते. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर येथे जाणून घ्या असे काही उपाय जे तुमच्या त्वचेचे अकाली वृद्धत्व टाळतात आणि सर्व समस्या दूर करतात.
अन्नाचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि सौंदर्यावर होतो. हेल्दी फूड शरीराला निरोगी तर बनवतेच शिवाय त्वचा तजेलदार राहते. आपले नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या आहारात हिरव्या भाज्या, अंकुरलेले धान्य आणि फळांचा समावेश करा. याशिवाय फ्लेक्ससीड, बदाम, अंजीर आणि अक्रोड खा.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोमेजायला लागते. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि त्वचेला चमक आणते. त्यामुळे दररोज किमान 4 लिटर पाणी पिण्याची सवय लावा.
सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेवर अनेक समस्या निर्माण होतात. हे टाळण्यासाठी सनस्क्रीन क्रीम लावूनच उन्हात जा. तसेच त्वचा पूर्णपणे कवर करा.
अनेक वेळा लोक बाहेरुन परतल्यावर पाण्यानेच तोंड धुतात. परंतु यामुळे त्वचा पूर्णपणे स्वच्छ होत नाही कारण बाहेरील धूळ आपल्या त्वचेच्या छिद्रांमध्ये भरते. त्याच्या खोल साफसफाईसाठी चांगल्या कंपनीचे क्लीन्झर वापरा. कापसात क्लिन्जर घेऊन धूळ साफ करा, त्यानंतर फेसवॉशने चेहरा धुवा. तुम्ही दुधाचा क्लीन्झर म्हणूनही वापर करू शकता. झोपण्यापूर्वीही त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा.
त्वचेवर सुरकुत्या येण्याचे एक कारण म्हणजे त्वचेला मॉइश्चरायझ न ठेवणे. यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते आणि त्वचेवर ताणल्याचा अनुभव येतो. त्यामुळे वेळेपूर्वी सुरकुत्या दिसू लागतात. हे टाळण्यासाठी चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर वापरा जेणेकरून तुमच्या त्वचेला पोषण मिळेल.
झोप न मिळाल्याने चेहरा फिका पडतो, डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात. अशा समस्या टाळण्यासाठी दररोज किमान सात ते आठ तासांची झोप घ्या. याशिवाय नियमितपणे योगा आणि व्यायाम करा. (If you want to protect yourself from the effects of aging, take care of your skin)
इतर बातम्या
Side Effects of Amla : ‘या’ लोकांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय आवळा खाऊ नये, वाचा याबद्दल सविस्तर!
Beauty Tips : चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर, वाचा सविस्तर!