मुंबई : जसजसे आपले वय वाढते तसतसे शरीराचे अवयव कमकुवत होण्यास सुरूवात होते. तसेच वाढत्या वयाचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील होतो. त्वचेवर सुरकुत्या, बारीक रेषा, डाग, त्वचा फिकट, निर्जीव आणि निस्तेज बनते. काही बाह्य घटकांमुळेही त्वचेचे नुकसान होते. जसे की वायू प्रदूषण, सूर्याची हानिकारक किरणे, धूळ आणि घाण, अस्वच्छ अन्न, त्वचा स्वच्छ न करणे, तणाव, चिंता यामुळेही देखील आपल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात.
जर त्वचा जास्त काळ तेजस्वी आणि तजेलदार हवी असेल तर योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचा स्वच्छ करण्यासोबतच रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या नाईट क्रीम देखील लावा. यामुळे आपल्या त्वचेच्या सर्व समस्या दूर जाण्यास तर मदत होईल, शिवाय आपली त्वचा तजेलदार होण्यास मदत होईल. चेहरा नेहमी तरूण ठेवण्यासाठी बाजाराऐवजी घरगुती नाईट क्रीम लावा. ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
आपण ऑलिव्ह ऑइलच्या मदतीने नाईट क्रीम तयार करू शकता. यातील फॅटी अॅसिड त्वचेचा कोरडेपणा दूर करतो. तसेच सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण होते. ऑलिव्ह ऑईल नाईट क्रीम घरी तयार करण्यासाठी आपल्या ऑलिव्ह ऑईलमध्ये बदाम तेल आणि खोबरेल तेल मिक्स करावे लागेस. त्यानंतर हे मिश्रण आपल्या त्वचेवर झोपण्याच्या अगोदर लावा. सकाळी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.
एक चमचा मलई, एक चमचा ग्लिसरीन, एक चमचा गुलाबपाणी, एक चमचा ऑलिव तेल घ्या. सर्व गोष्टी नीट मिक्स करा. क्रीम खूप पातळ होणार नाही याची काळजी घ्या. यानंतर, रोज रात्री हे क्रीम त्वचेवर लावा. हिवाळ्यात हे खूप चांगले कार्य करते आणि कोरडी त्वचा असलेल्यांसाठी हे खूप उपयुक्त आहे. ते लावल्याने त्वचा हायड्रेट होते आणि त्वचा खोल मॉइस्चराइज होते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..