मुंबई : सध्या केसांना मेंहदी लावण्याचा ट्रेड आहे. केसांना मेंहदी लावल्याने केस सुंदर, चमकदार आणि मोकळे होतात. यामुळे महिला आणि मुली जास्त करून केसांना मेंहदी लावण्यावर भर देत आहेत. केस फक्त पांढरेच झाल्यावर मेंहदी लावली जात नाही. तर केसांची पोत सुधारण्यासाठी देखील केसांना मेंहदी लावली जाते. आपण नेहमी मेंहदी लावताना मेंहदीमध्ये काहीही मिक्स न करता लावतो. मात्र, आपण मेंहदीमध्ये काही घटक मिक्स करून लावले तर अधिक फायदा होतो.
-मेंहदी भिजवताना मेंहदीमध्ये लिंबाचा रस मिक्स केला पाहिजे. लिंबाचा रस आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर असतो. मेंहदीमध्ये लिंबाचा रस मिक्स केल्याने केस गळती कमी होण्यास मदत होते. शिवाय यामुळे आपले केस मोकळे होण्यास देखील मदत होते. यामुळे नेहमी मेंहदी भिजवताना लिंबाचा रस मेंहदीमध्ये मिक्स केला पाहिजेत.
-कधीकधी मेंहदी लावल्याने केस कोरडे आणि खडबडीत होतात. केस कोरडे होण्यापासून रोखण्यासाठी, मेंहदीसह तेल लावा. जर तुम्ही कलरसाठी मेंहदी लावत असाल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईल किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही तेल वापरू शकता.
-केसांना मेंहदी लावण्यासाठी भिजवताना नेहमी मेंहदीमध्ये दही मिक्स केले पाहिजे. यामुळे आपल्या केसांना कंडीशनिंग मिळते. मेंहदीमध्ये दही मिसळल्यामुळे आपल्या केसांमध्ये गुंता देखील होत नाही. मात्र, नेहमी मेंहदीमध्ये दही मिक्स करताना लक्षात ठेवा की, दही हे घरी केलेलेच असावे. शक्यतो दही जास्त आंबट असेल तर अधिक फायदेशीर असेल.
-मेंहदीने केस धुल्यानंतर केसांमध्ये तेल किंवा सीरम लावा. जर तुम्ही केस गळणे आणि कोंडा होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर मेंहदी लावताना मिश्रणात एक चमचा लिंबाचा रस, दही, आवळा घाला. या सर्व गोष्टी मिसळा आणि टाळूवर लावा. हे मिश्रण सौम्य शैम्पूने धुवा.
-जेव्हाही तुम्ही मेंदी लावाल तेव्हा त्यात आवळा पावडर घाला. तसेच मेंहदीमध्ये दही किंवा अंडे मिसळा. यानंतर केसांना मेंदी लावा. असे केल्याने केसांमध्ये मेंदीचा कोरडेपणा येत नाही. यामुळे केस गुळगुळीत होतात आणि केसांमध्ये चमक येते. आपण इच्छित असल्यास, आपण मेंदीमध्ये आवळा तेल किंवा बदाम तेल देखील मिसळू शकता. यामुळे कोरडेपणाही मोठ्या प्रमाणात कमी होतो.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(It is beneficial to mix these ingredients when applying mehndi to hair)