Karwachauth: आता पार्लरमध्ये नव्हे तर घरबसल्या करू शकता फेशिअल, कमी बजेटमध्ये मिळेल निखार

| Updated on: Oct 06, 2022 | 12:33 PM

फेशिअलसाठी वापरले जाणारे केमिकल प्रॉडक्ट्स तुमच्या त्वचेला नुकसान पोचवू शकतात. अशा वेळी आम्ही तुम्हाला आज होममेड (घरगुती) फेशिअलबद्दल सांगणार आहोत.

Karwachauth: आता पार्लरमध्ये नव्हे तर घरबसल्या करू शकता फेशिअल, कमी बजेटमध्ये मिळेल निखार
आता पार्लरमध्ये नव्हे तर घरबसल्या करू शकता फेशिअल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: करवाचौथचा (karwachauth) सण हा महिलांसाठी खूप खास असतो. एक महिना आधीपासूनच महिला या सणाची तयारी जोरात सुरू करतात. करवाचौथच्या दिवशी स्त्रिया तयार होऊन उपवास करतात. एकीकडे काही महिला घरी तयारी करणं पसंत करतात. तर त्याचवेळी काही महिलांना ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सजायला (getting ready) आवडतं. तेथे त्या विविध तऱ्हेचे फेशिअल करतात. मात्र अनेक वेळा ब्युटी प्रोडक्ट्समुळे (beauty products) त्वचेचं मोठं नुकसान होतं. आज आम्ही येथे तुम्हाला होममेड (घरगुती) फेशिअलबद्दल (homemade facial)सांगणार आहोत, जे त्वचेसाठी फायदेशीर ठरेल आणि त्वचेचे नुकसानही होणार नाही. तसेच ते तुमच्या बजेटमध्येही बसेल.

दुधाने करा फेशिअल

अनेक महिलांना पार्लरला जायला वेळ नसतो, पण काही महिला थोडंफार बजेट घेऊन पार्लरमध्ये जातात. अशावेळी तुम्ही घरी बसून कमी खर्चात पार्लरसारखे फेशियल करू शकता. तुम्ही घरी कच्च्या दुधाने फेशिअल करू शकता. कच्च्या दुधात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फॅटी ॲसिड्स सारखे अनेक पोषक घटक असतात.

हे आपली त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते. याशिवाय चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्यानेही इन्स्टंट ग्लो येतो. दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळते, जे चेहरा नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट करते.

हे सुद्धा वाचा

असा करावा वापर

कच्च्या दुधाने तुम्ही क्लींजिंग करू शकता. खरंतर, क्लीजिंग ही पहिली पायरी असते, ज्यामुळे त्वचेवर असणारी सर्व धूळ आणि माती निघून जाते. त्यासाठी 3 चमचे कच्चे दूध आणि लिंबू घ्या. नंतर एका बाऊलमध्ये लिंबू आणि कच्चे दूध चांगले मिसळा. मिसळल्यानंतर ते 5 ते 7 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा व नंतर पाण्याने धुवा.

स्क्रबिंग

फेशिअलची दुसरी पायरी म्हणजे स्क्रबिंग असते. त्यासाठी कच्चे दूध, थोडीशी साखर , मसूर डाळीचे पीठ आणि तांदूळाचे पीठ एकत्र करावे. हे चेहऱ्याला लावून 5 मिनिटे स्क्रब करावे नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

फेसपॅक

फेशिअलची तिसरी आणि शेवटची पायरी म्हणजे फेसपॅक होय. यासाठी कॉफी, कच्चं दूध, कोरफड आणि मध घालून फेसपॅक तयार करावा. हे मिश्रण १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे व त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. यानंतर चेहऱ्यावर सीरम लावावे ज्यामुळे आपली त्वचा कोरडी होणार नाही.