मुंबई : लॅव्हेंडर तेल आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अरोमाथेरपीचा प्रश्न येतो तेव्हा त्याचा प्रमुख वापर केला जातो. लॅव्हेंडर तेलाचे इतर अनेक फायदे आहेत जसे की या फुलाचा वापर परफ्यूमसाठी देखील केला जातो. विशेष प्रसंगी घराची सजावट करण्यासाठी देखील केला जातो. हे तेल केस आणि त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे आणि आपण ते कसे वापरू शकतो ते जाणून घेऊया. (Lavender Oil is extremely beneficial for the skin)
मुरुमाची समस्या
लॅव्हेंडरमध्ये बॅक्टेरिया मारण्याची आणि मुरुमांना बरे करण्याची क्षमता आहे. हे बंद छिद्र उघडते आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. तुम्ही हे तेल नारळाचा तेलामध्ये मिक्स करून लावू शकता. आपला चेहरा धुवा आणि लावा. आपण फेस टोनर म्हणून देखील वापरू शकता. तेलाचे दोन थेंब एक चमचे विच हेझेलमध्ये मिसळा. त्यात काही कॉटन पॅड भिजवून चेहऱ्यावर लावा.
कोरडी त्वचा
जर तुम्ही कोरड्या त्वचेने त्रस्त असाल तर तुम्ही लॅव्हेंडर तेल वापरू शकता. यामुळे दाह कमी होण्यास मदत होते. यात अँटीफंगल गुणधर्म आहेत. त्यात दोन थेंब चहाच्या झाडाच्या तेलाचे मिसळा. त्यात दोन चमचे नारळ तेल मिसळा. हे चांगले मिक्स करू घ्या आणि चेहऱ्यावर लावा.
पिग्मेंटेशन
आपण चमकदार त्वचेसाठी लॅव्हेंडर तेल वापरू शकता. हे दाह कमी करण्यास मदत करू शकते. हे डार्क स्पॉट्सपासून मुक्त होण्यास मदत करते. जर तुम्हाला हायपरपिग्मेंटेशनची समस्या असेल तर तुम्ही हे तेल वापरू शकता. त्याचे काही थेंब घ्या आणि त्यात थोडे मॉइश्चरायझर आणि खोबरेल तेल घाला आणि दिवसातून एकदा किंवा दोनदा वापरा.
दाहक-विरोधी
लॅव्हेंडर तेल वेदनादायक दाहपासून मुक्त होण्यास मदत करते. जळजळ कमी करण्यासाठी लॅव्हेंडर तेलाचे तीन थेंब आणि नारळाचे तेल दोन चमचे एकत्र करा. दिवसातून तीन वेळा हे तेल लावा.
केसांची वाढ
केसांच्या वाढीसाठी तुम्ही लॅव्हेंडर तेल देखील वापरू शकता. विशेष म्हणजे हे तेल केसांची वाढ होण्यासाठी फायदेशीर आहे. केस गळती कमी करण्यासाठी आपण दररोज हे तेल केसांना लावले पाहिजे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Lavender Oil is extremely beneficial for the skin)