मुंबई : हल्ली केसांच्या समस्यांमुळे प्रत्येक जण चिंतेत असतो. चांगल्या केसांसाठी फक्त चांगले उत्पादने वापरून उपयोग नाही, तर केसांची योग्य काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा महागड्या उत्पादनांतूनही केसांना पाहिजे असलेली पोषक तत्त्वे मिळत नाहीत. त्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागतात. जर तुम्हाला खरोखरच सुंदर आणि चमकदार केस हवे असतील तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. (Lemon juice is extremely beneficial for beautiful hair)
लिंबू, व्हिटॅमिन सी समृध्द, आपल्या केसांसाठी आणखी एक उत्तम नैसर्गिक घटक आहे. लिंबाचे अँटीफंगल गुणधर्म आपल्याला टाळूला निरोगी आणि संसर्गमुक्त ठेवण्यास मदत करू शकतात. जर तुमची टाळू तेलकट असेल तर हे स्प्रे वापरणे फायदेशीर ठरू शकते. स्प्रेमध्ये उपस्थित लिंबाचा रस तेल नियंत्रित करण्यास मदत करतो. डोक्यातील कोंडावर लिंबू एक उत्तम उपाय आहे. केस गळण्यासाठी तुम्ही हे हेअर स्प्रे वापरू शकता.
आता एका सॉसपॅन/तव्यामध्ये एक कप नारळ तेल गरम करा आणि त्यात ही पेस्ट घाला आणि एकदा ढवळा. नंतर गॅस बंद करा आणि सॉसपॅनला थोड्यावेळासाठी झाकून ठेवा. थंड झाल्यावर, ते एका कंटेनरमध्ये भरा आणि आठवड्यातून किमान तीन दिवस केसांवर लावा. यामुळे केस गळती कमी होते. आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी कोरफड खूप उपयुक्त आहे.
कोरफड, नारळ तेल आणि कांद्याचा रस यांचे तेल घरी तयार करून केसांना लावले तर केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. तेल तयार करण्यासाठी सर्वात अगोदर कांदा बारीक किसून अथवा कांदा ज्यूसरमधून काढला तरी चालतो मात्र, कांद्याचा रस हा ताजा असावा. त्यानंतर कोरफड द्या कोरफडीचा बाजूचा सर्व भाग काढून टाका. त्यानंतर कांद्याचा रस कोरफड आणि नारळाचे तेल एकत्र करा आणि केसांना लावा.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Lemon juice is extremely beneficial for beautiful hair)