Skin Care : त्वचेला ग्लो आणायचाय?, एकदा लीचीचा ‘हा’ फेसपॅक वापरा, रिझल्ट पाहा…

| Updated on: Jun 30, 2021 | 10:46 AM

लीची हे फळ त्याच्या गोड चवीमुळे ओळखले जाते. लीची एक आरोग्यदायी फळ आहे. मात्र, लीची हे फक्त आरोग्यासाठी नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे.

Skin Care : त्वचेला ग्लो आणायचाय?, एकदा लीचीचा हा फेसपॅक वापरा, रिझल्ट पाहा...
लीचीचा फेसपॅक
Follow us on

मुंबई : लीची हे फळ त्याच्या गोड चवीमुळे ओळखले जाते. लीची एक आरोग्यदायी फळ आहे. मात्र, लीची हे फक्त आरोग्यासाठी नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. अनेक साैदर्य उत्पादनामध्ये लीचीचा वापर हा केला जातो. लीचीच्या झाडाचे साल, बिया, पानेही फार औषधी आहेत. लीचीच्या बियांमध्ये विषनाशक आणि वेदना निवारक गुणधर्म असतात. (Lychee face pack is extremely beneficial for the skin)

विशेष म्हणजे लीचीचा फेसपॅक आपण घरच्या घरी तयार करू शकतो. हा फेसपॅक लावल्याने चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर जाण्यास मदत होते. लीचीचा फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वात अगोदर तीन लीचीचा गर काढून घ्या आणि त्यामध्ये गुलाब पाणी आणि हळद मिक्स करा आणि चेहऱ्यासह मानेवर ही पेस्ट लावा. साधारण अर्ध्या तासांसाठी ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि त्यानंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसांमधून साधारण तीन वेळा तरी लावला पाहिजे.

आपण केळी आणि लीची फेसपॅक देखील घरी तयार करू शकतो. यासाठी अर्धी केळी आणि चार लीचीचा गर लागणार आहे. हे दोन्ही चांगले मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण दहा मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर  चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होईल. मात्र हा फेसपॅक तयार करताना लीची नेहमी ताजीच असावी.लीचीमध्ये व्हिटॅमिन ई असते. त्यात व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, पॉलीफेनॉल, ऑलिगोनॉल आणि इतर अँटीऑक्सिडेंट असतात.

हे त्वचेचे डाग काढून टाकण्यास तसेच त्वचा सुधारण्याचे काम करतात. केस चमकदार करण्यासाठी आपण लीची वापरू शकता. यासाठी लीचीची लगदा काढा आणि मॅश करा. ते 15 मिनिटांसाठी केसांवर लावा. हे केस चमकदार बनविण्यात मदत करेल. लीचीमध्ये फायटोकेमिकल्स असतात. हे अँटीऑक्सिडेंट आणि अँटीनोप्लास्टिक गुणधर्मांनी समृद्ध आहे. डोळ्यांशी संबंधित समस्यांसाठी हे फायदेशीर आहे. हे डोळ्यांचा धूरकटपणा आणि मोतीबिंदू रोखण्यास मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Holi 2021 | रासायनिक रंगानी होऊ शकतो कर्करोगाचा धोका, होळीच्या रंगाचा बेरंग होण्यापूर्वी जाणून घ्या दुष्परिणाम!

(Lychee face pack is extremely beneficial for the skin)