मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, मसूर डाळीचे (Masoor dal) सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात प्रथिने भरपूर असतात. हे आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. मसूर डाळ त्वचेसाठी (Skin) नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. हे त्वचेचे डाग आणि टॅन काढून टाकते, तुमची त्वचा सुधारते, तुम्ही फेस पॅक (Facepack) म्हणून देखील वापरू शकता. या मसूरमध्ये अनेक प्रकारचे नैसर्गिक घटक मिसळून तुम्ही फेसपॅक बनवू शकता. मसूर डाळा त्वचेला खोलवर पोषण देण्याचे काम करते. चला जाणून घेऊया तुम्ही मसूराच्या डाळीचे फेसपॅक घरी नेमके केस तयार करायचे.
5 चमचे मसूर घ्या आणि रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी बारीक करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर तसेच मानेला लावा. त्यानंतर संपूर्ण चेहऱ्याचा मसाज करा आणि 5 ते 10 मिनिटे राहू द्या. यानंतर साध्या पाण्याने धुवा, तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. या पेसपॅकमुळे आपल्या चेहऱ्याचा रंग सुधारण्यास मदत होते.
3 चमचे मसूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची पेस्ट बनवा. त्यात लिंबाचा रस मिक्स करून ती पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. या पॅकमुळे आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. वीस मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.
5 चमचे मसूर बारीक करून पावडर बनवा. एका भांड्यात मसूर पावडर घ्या. त्यात ताजे दही घालून चांगले मिसळा, मानेवर आणि चेहऱ्यावर लावा. त्वचेला मसाज करा आणि 10 ते 15 मिनिटे राहू द्या. नंतर साध्या पाण्याने धुवा. या खास फेसपॅकमुळे आपल्या चेहऱ्यावरील टॅन जाण्यास नक्कीच मदत होईल.
3 चमचे मसूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची पेस्ट बनवा. त्यात एक चमचा तांदळाचे पीठ आणि मध घालून चांगले मिसळा. हा फेसपॅक त्वचेवर लावा, 10 मिनिटे तसाच राहू द्या. यानंतर ताज्या पाण्याने धुवा. तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्य़ास मदत होते.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
Hair Care | पातळ आणि निर्जीव केसांना निरोगी बनवण्यासाठी या आयुर्वेदिक टिप्स फाॅलो करा!
Hair | उन्हामुळे केसांना होणारे नुकसान टाळण्यासाठी हे घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर!