Masoor Dal Face Pack : मसूर डाळीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

| Updated on: Sep 11, 2021 | 12:29 PM

मसूर डाळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मसूर पोषक तत्वांनी समृद्ध आहे. मसूर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण मसूर डाळीचे फेसपॅक घरचे घरी तयार करू शकतो. या फेसपॅकमुळे मुरूम, सुरकुत्या, काळपटपणा दूर होण्यास मदत होते.

Masoor Dal Face Pack : मसूर डाळीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
फेसपॅक
Follow us on

मुंबई : मसूर डाळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मसूर पोषक तत्वांनी समृद्ध आहे. मसूर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण मसूर डाळीचे फेसपॅक घरचे घरी तयार करू शकतो. या फेसपॅकमुळे मुरूम, सुरकुत्या, काळपटपणा दूर होण्यास मदत होते. घरी मसूर डाळीचे फेसपॅक कसे तयार करायचे हे आपण बघणार आहोत. (Masoor Dal Facepack is beneficial for the skin)

मसूर डाळीचा फेसपॅक – 3-4 चमचे मसूर डाळ घ्या आणि ते रात्रभर पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची चांगली पेस्ट तयार करा. हे संपूर्ण चेहऱ्यावर तसेच मानेवर लावा. काही मिनिटांसाठी चेहऱ्याची मालिश करा. 5-10 मिनिटे सोडा आणि साध्या पाण्याने धुवा. आपण आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हे वापरू शकता.

मसूर आणि दही – 2-3 चमचे मसूर बारीक करून पावडर बनवा. एका भांड्यात थोडी मसूर पावडर घ्या आणि त्यात दही घाला. स्किन लाईटनिंग फेस मास्क तयार करण्यासाठी एकत्र मिसळा. ते चेहऱ्यावर तसेच मानेवर लावा आणि काही मिनिटांसाठी त्वचेला हलक्या हाताने मसाज करा. ते धुण्यापूर्वी 10-15 मिनिटे त्वचेवर सोडा. हा उपाय आठवड्यातून 2-3 वेळा करा.

मसूर आणि कोरफड – 2-3 चमचे मसूर डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी पेस्ट करून घ्या. त्यात एक चमचा कोरफड जेल टाका आणि ते एकत्र मिसळा म्हणजे अँटी -अँनी फेस मास्क तयार होईल. हे सर्व चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि काही मिनिटांसाठी मालिश करा. स्वच्छ पाण्याने धुण्यापूर्वी ते 5-10 मिनिटे सोडा. हा उपाय आठवड्यातून दोनदा केला जाऊ शकतो.

मसूर डाळ आणि मध – 2-3 चमचे मसूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडे मध घाला. अँटी एजिंग फेस मास्क तयार करण्यासाठी एकत्र मिसळा. चेहऱ्यावर आणि मानेवर काही मिनिटांसाठी मालिश करा. 5-10 मिनिटे त्वचेवर सोडा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा करू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Masoor Dal Facepack is beneficial for the skin)