मुंबई : जर तुम्हाला असे वाटत असेल की स्वच्छ आणि सुंदर त्वचा फक्त महिलांसाठी आवश्यक आहे तर तुम्ही चुकीचे आहात. कारण पुरुषांसाठी देखील स्वच्छ आणि चांगली त्वचा आवश्यक असते. महिलांप्रमाणेच पुरुषांनीही त्यांच्या त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पुरुषांनी वेळीच त्यांच्या त्वचेची काळजी घेतली नाही तर त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. यामुळे तुमचा स्मार्टनेसही कमी होईल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पुरुषांनी त्यांच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी.
फेस स्क्रबचा वापर करा
पुरुषांनी त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस स्क्रब वापरणे आवश्यक आहे. फेस स्क्रब तुमची त्वचा चांगली करते आणि त्वचेतील खराब, मृत पेशी काढून टाकते. पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या त्वचेवर फक्त चांगल्या दर्जाचा फेस स्क्रब वापरा. यासोबतच पुरुषांनी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर टोनर लावले पाहिजे. रात्री टोनर लावा आणि सकाळी थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. एवढेच नाही तर पुरुषांनी सन ब्लॉक लोशन किंवा सनस्क्रीन वापरणे खूप महत्वाचे आहे.
चेहऱ्यासाठी साबण
हे नेहमीच पाहिले गेले आहे की बहुतेक पुरुष त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे साबण लावतात. परंतु असे करू नये. कारण यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. पुरुषांनी चेहऱ्यासाठी फक्त कमी पीएच पातळी असलेले साबण वापरावे.
मॉइश्चरायझर आवश्यक
साधारणपणे पुरुषांना असे वाटते की, त्यांना मॉइश्चरायझरची गरज नाही. तर हिवाळ्याच्या हंगामात पुरुषांच्या चेहऱ्यावर कोरडेपणाही दिसतो. अशा परिस्थितीत, मॉइश्चरायझर आवश्यक पोषण देऊन आपली त्वचा कोरडे होण्यापासून वाचवते. मॉइश्चरायझरमुळे त्वचा चमकदार होते.
डोळ्यांखालील त्वचेची विशेष काळजी घ्या
पुरुषांना वाटते की, त्यांना त्यांच्या डोळ्यांची काळजी घेण्याची गरज नाही, पण असे नाही कारण बदलत्या हंगामात निर्जलीकरण, घाम आणि तेल ग्रंथींमुळे, डोळ्यांभोवतीची त्वचा अनेकदा कोरडी होते. ज्यामुळे डोळ्यांभोवती सुरकुत्या येतात. अशा परिस्थितीत या समस्या टाळण्यासाठी आपण झोपायच्या आधी डोळ्यांजवळ आय क्रीम लावावी.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Men should take care of their skin in these 4 ways)