मुंबई : दूध हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दुधात प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटक असतात. फक्त दुधच नाही तर दुधावरची साय देखील आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. आपण जर दुधावरची साय आपल्या चेहऱ्याला लावली तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. (Milk cream is beneficial for the skin)
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या संपूर्ण चेहऱ्याला दुधावरची साय लावली पाहिजे. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. चेहऱ्यावर अर्धा तासांसाठी साय लावा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. विशेष म्हणजे सतत एक महिना आपण साय चेहऱ्याला लावली तर आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी दुधावरची साय, गुलाब पाणी, हळद, चंदन पावडर आणि खोबरेल तेल हे साहित्य लागणार आहे. सर्वात प्रथम दुधावरच्या सायमध्ये हळद,गुलाब पाणी, चंदन पावडर आणि खोबरेल तेल मिक्स करा. ही पेस्ट काही वेळ तशीच ठेवा आणि त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर ही पेस्ट लावा. साधारण वीस मिनिटांनंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. ही पेस्ट आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा लावू शकतो.
आपली त्वचा सतत कोरडी पडत असेल तर आपण चेहऱ्याला दुध देखील लावू शकतो. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. जर आपल्याला चेहऱ्यावरील डाग काढून टाकायचे असतील, तर 1 चमचा चंदन पावडरमध्ये 2 चमचे दूध घालून पेस्ट बनवा. आता त्यात एक चमचा बदाम पावडर मिक्स करा. या तिन्ही घटकांना चांगले मिसळा आणि ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. कोरडी झाल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Lemon Benefits | लिंबाचा सुगंध मूड करेल फ्रेश, शरीरालाही होतील प्रचंड फायदे, संशोधकांचा दावा!https://t.co/gCPTFuYHZw#LEMONADE #lemon #Lemonfragrance
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 15, 2020
(Milk cream is beneficial for the skin)