Harnaaz Sandhu | हरनाज संधूच्या सौंदर्याचं रहस्य काय? चमकदार त्वचेसाठी मिस युनिव्हर्सच्या टिप्स

| Updated on: Dec 15, 2021 | 1:19 PM

भारतीय सौंदर्याने पुन्हा एकदा जगात आपली छाप पाडली आहे. पंजाबमधील (Punjab) हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) मिस युनिव्हर्सचा किताब पटकवत भारताला 21 वर्षांनंतर हा सन्मान मिळवून दिला आहे. हरनाजने आपल्या चमकदार त्वचेचं रहस्य सांगितलं आहे. ती दिवसात काही गोष्टी आवर्जून करते. ज्यामुळे तिची त्वचा कायम ग्लो करते.

Harnaaz Sandhu | हरनाज संधूच्या सौंदर्याचं रहस्य काय? चमकदार त्वचेसाठी मिस युनिव्हर्सच्या टिप्स
Harnaaz
Follow us on

मुंबई : विश्वसुंदरी हरनाज संधू (Harnaaz Sandhu) हिच्या सौंदर्याची जगभरात चर्चा होतेय. प्रत्येक मुलीला वाटतं आपली स्किन ग्लो करावी. हरनाज आता वर्षभरात वेगवेगऴ्या कार्यक्रमात बिझी असणार आहे. अशात ती आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काय करणार आहे. हे तिने खास आपल्याला सांगितलं आहे. चमकदार त्वचेसाठी हरनाज करते दिवसभरात या चार गोष्टी.

1. चेहरा क्लीनजिंग मिल्कने साफ करा (cleansing milk)

आपल्या रोजच्या रूटीनमध्ये आपण क्लींजिंग मिल्कचा वापर करावा. क्लींजिंगचा वापर करणे हे एका सौंदर्यवतीसाठी सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे, असं हरनाजचं म्हणं आहे. ती पुढे म्हणते की ती क्लींजिंग मिल्कचा वापर न करता घराच्या बाहेर पण पडत नाही. मी एक मुलगी आहे जिला तिच्या चेहराची काऴजी घेणं खूप आवडतं. आणि ती सगळ्याच मुलींना आवडत असतं. हरनाजची स्किन कोरडी आणि संवेदनशील आहे त्यामुळे तिला क्लीनजिंग मिल्कचा खूप फायदा होतो. तर संपूर्ण चेहऱ्यावर क्लींजिंग मिल्कचा वापर करण्याचा सल्ला मिस युनिव्हर्सने दिला आहे.

2. बॅलन्सिंग टोनर (Balancing toner)
बॅलन्सिंग टोनर प्रत्येक मुलीने चेहऱ्यावर वापरलं पाहिजे, असा सल्ला हरनाज देते. ते म्हणते, टोनर चेहऱ्यावर टॅप करावा, तो कधी चेहऱ्यावर घासू नये. असं केल्यास त्वचेचं नुकसान होतं. टोनर आपल्यामुळे स्किन मॉइश्चरायझ होते आणि मऊ होण्यास मदत होते.

3. नियमित स्वरुपात मॉइश्चरायझिंग (moisturizer)

स्किन रोज मॉइश्चरायझ करणे खूप महत्त्वाचे आहे. दिवसभर त्वचा हायड्रेट करण्यासाठी मॉइश्चरायझिंगचा खूप फायदा होतो, असं हरनाज सांगते. दररोज मॉइश्चरायझिंग केल्याने आपली त्वचा कोरडी पडत नाही. तसंच चेहरा तेलकट होण्यापासून वाचतो. त्वचा कोरडी असणे किंवा तेलकट असल्याने चेहऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, असं हरनाजचं म्हणं आहे. त्यामुळे प्रत्येक मुलींनी चेहऱ्याची योग्य काळजी घेण्याचा सल्ला हरनाज देते.

4. SPF सनस्क्रीन लोशन नक्की वापरा (SPF sunscreen lotion)

सूर्य किरण आणि प्रदूषणापासून त्वचेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे खास करुन महिलांनी SPF सनस्क्रीन लोशन वापरणं खूप गरजेचं असल्याचं हरनाज सांगते. ती असंही म्हणते तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला सनस्क्रीन लोशन लावण्यासाठी फक्त दिवसातून 10 मिनिटं लागतात. आणि या 10 मिनिटांमुळे तुम्ही दिवसभर तुमचा चेहरा हायड्रेटेड आणि सुरक्षित ठेवू शकतात.

संबंधित बातम्या :

दोन तोंडी केसांची समस्या दूर करायची असेल तर ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

गोरे दिसण्यासाठी तुम्ही वापरत आहात स्किन व्हाइटिंग क्रीम; या क्रीमने होऊ शकतं त्वचेचं नुकसान

हिवाळा आला… टाचांच्या भेगापासून तुम्ही आहात त्रस्त… मग करा हे घरगुती उपाय