मुंबई : त्वचेची काळजी म्हणजे केवळ महागडी उत्पादने वापरणे नव्हे. बहुतेक लोक त्यांच्या त्वचेच्या प्रकारानुसार उत्पादने आणि सौंदर्य दिनचऱ्या पाळतात. बरेच लोक घरगुती उत्पादने त्यांच्या त्वचेच्या काळजीच्या दिनक्रमात वापरतात. विशेषतः हे उपाय प्रभावी आहेत आणि त्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. (moong dal Extremely beneficial for the skin)
पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या काळात तेल आणि आर्द्रतेमुळे मुरुमांची समस्या वाढते. जर तुम्हाला मुरुमांमुळे त्रास होत असेल तर तुम्ही मूगडाळीचा फेसपॅक आपल्या त्वचेला लावू शकतात. ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
फेसमास्क तयार करण्यासाठी
साहित्य
1 चमचा मूगडाळी पेस्ट
1 चमचा कोरफड जेल
चिमूटभर हळद
प्रक्रिया
जर तुम्हाला बाजारातून पावडर विकत घ्यायची नसेल तर मूग एका वाडग्यात रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी मुगाची पेस्ट तयार करा आणि त्यात वरील सर्व गोष्टी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.
2. हायड्रेटिंग मास्क
साहित्य
एक चमचा मूगडाळ पावडर
एक चमचा मध
एक चमचा दही
प्रक्रिया
या सर्व गोष्टी नीट मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार मसाज करा. ही पेस्ट 15 ते 20 मिनिटे सोडा आणि नंतर पाण्याने धुवा.
3. सुंदर त्वचेसाठी फेसमास्क
साहित्य
1 चमचा मूगडाळ पावडर
1 चमचा पपईचा लगदा
2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल
प्रक्रिया
एका वाडग्यात सर्व साहित्य चांगले मिसळा आणि जाड पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. सुमारे 15 मिनिटे सोडा आणि नंतर पाण्याने धुवा.
संंबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(moong dal Extremely beneficial for the skin)