मुंबई : सध्याच्या हंगामात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण मोसंबीचा रस आपल्या त्वचेला लावला पाहिजे. फेसवाॅश आणि अनेक क्रिममध्ये मोसंबीच्या रस वापरला जातो. मोसंबी आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. मोसंबी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे कार्य करते. त्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. (mosambi juice is beneficial for eliminating the problem of dark spots on the face)
काळे डाग काढण्यासाठी
पावसाळ्यामध्ये त्वचा तेलकट होते, ज्यामुळे काळे आणि गडद वर्तुळांचा त्रास होतो. जर तुम्हालाही या समस्येने ग्रासले असेल तर मग मोसंबीचा रस आपल्यासाठी फायदेशीर आहे. आपल्या चेहऱ्यावर ज्याठिकाणी काळे डाग आले आहेत. त्यासाठी कापसाच्या सहायाने आपण मोसंबीचा रस आपल्या चेहऱ्यावर लावला पाहिजे. नियमितपणे मोसंबीचा रस चेहऱ्याला लावल्याने काळ्या डागांची समस्या दूर होण्यास मदत होते.
मुरुमाची समस्या
त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण मोसंबी वापरू शकता. मोसंबीचा रस रक्ताला शुद्ध करण्यास मदत करतो. याशिवाय त्वचेची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही मोसंबीचा रस वापरू शकता. या व्यतिरिक्त आपण याचा वापर मान, कोपर, गुडघे आणि डोळ्याभोवती असलेल्या गडद वर्तुळे दूर करण्यासाठी देखील करू शकतो. हे अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-बायोटिक्समध्ये समृद्ध आहे जे त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यात मदत करते.
ब्लीचिंग एजंट म्हणून कार्य करते
मोसंबीचा रस त्वचेमध्ये ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतो. त्याऐवजी आपण लिंबू देखील वापरू शकता. मोसंबीचा वापर त्वचेवरील डाग आणि रंगद्रव्य काढून टाकण्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!
(mosambi juice is beneficial for eliminating the problem of dark spots on the face)