टॅनिंग कमी करण्यापासून ते त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मुलतानी माती फायदेशीर!

| Updated on: Jun 17, 2021 | 6:39 PM

टॅनिंग कमी करण्यासाठी आपण नारळ तेल, साखर आणि मुलतानी माती एकत्र मिक्स करा. आणि ते चेहऱ्यावर लावू लावा. हलक्या हाताने चेहऱ्यावर स्क्रब करून ते काढा. यामुळे टॅनिंग कमी होण्यास मदत होईल.

टॅनिंग कमी करण्यापासून ते त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मुलतानी माती फायदेशीर!
फेसपॅक
Follow us on

मुंबई : काही लोकांची त्वचा इतकी कोरडी होते की, त्यांच्या त्वचेवर मॉइश्चरायझरपासून बाजारात मिळणारी सर्वात महाग उत्पादने देखील फार काळ काम करत नाहीत. जर, आपल्यासोबतही असेच काही घडत असेल तर, आपण घरगुती आणि आयुर्वेदिक मुलतानी मातीचा फेसपॅक लावून कोरडेपणाची समस्या दूर करू शकता आणि काही दिवसांत त्वचाही चमकदार दिसू लागेल. (Multani soil is beneficial for overcoming many skin problems)

टॅनिंग कमी करण्यासाठी आपण नारळ तेल, साखर आणि मुलतानी माती एकत्र मिक्स करा. आणि ते चेहऱ्यावर लावू लावा. हलक्या हाताने चेहऱ्यावर स्क्रब करून ते काढा. यामुळे टॅनिंग कमी होण्यास मदत होईल. चेहरा चमकदार बनवण्यासाठी तुम्ही टोमॅटोचा रस आणि चंदन पावडर मिक्स करून चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरील पेस्ट सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी मुलतानी माती, दूध आणि बदामाची पेस्ट बनवा. पेस्ट तयार करण्यासाठी बदाम रात्रभर भिजवा.

या पेस्टमुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी मुलतानी माती, दूध आणि बदामाची पेस्ट बनवा. पेस्ट तयार करण्यासाठी बदाम रात्रभर भिजवा. या पेस्टमुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. मुलतानी मातीचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी मुलतानी माती, अंडी आणि मध लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करून आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे आपला चेहरा सुंदर होईल.

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी आपण घरच्या घरी मुलतानी मातीचा फेसपॅक तयार करू शकतो. यासाठी मुलतानी माती एक चमचा, हळद आणि खोबरेल तेल लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास मदत होईल. बाजारात मिळणारी बरीच उत्पादने वापरल्यानंतरही, जर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स जात नसतील तर लिंबू आणि मधाची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा साधारण 15 मिनिटांनंतर हे धुवा. आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्याने तुमचा चेहरा साफ होईल.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya | पपईचे अतिसेवन शरीरासाठी घातक, अनेक आजारांना मिळेल निमंत्रण!

Skin care : ‘हे’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा !

(Multani soil is beneficial for overcoming many skin problems)