मुंबई : मुलतानी मातीचा वापर अनेक वर्षांपासून कॉस्मेटिक म्हणून केला जात आहे. मुलतानी मातीमध्ये मॅग्नेशियम, क्वार्ट्ज, सिलिका, लोह, कॅल्शियम, कॅल्साइट सारखी खनिजे आढळतात. विशेष म्हणजे ही मुलतानी माती फक्त आपल्या त्वचेसाठीच नाही तर आपल्या केसांसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. मुलतानी माती केसांना लावल्याने आपले केस सुंदर आणि मुलायम होण्यास मदत होते. (Multani soil is beneficial for skin and hair)
1. जर आपल्या डोक्यात कोंड्याची समस्या असेल तर आपण आठवड्यातून एकदा मेथीची पेस्ट, लिंबू आणि मुलतानी मातीचा हेअर पॅक केसांना लावला पाहिजे. हा पॅक साधारण अर्धा तास आपण केसांवर ठेवल्यानंतर शैम्पू आणि कंडिशनर केस धुवा. या पॅकमुळे डोक्यातील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.
2. कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी मुलतानी माती अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी मुलतानी मातीमध्ये मध आणि मेथीची पेस्ट मिक्स करा आणि टाळूपासून खालपर्यंत लावा. काही दिवसातच फरक दिसून येईल.
3. जर आपले केस कमी वयातच पांढरे होत असतील तर आपण मुलतानी मातीचा हेअर पॅक केसांना लावला पाहिजे. यामुळे आपल्या पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होईल. यासाठी एक वाटी मुलतानी माती घ्या आणि त्यामध्ये लिंबू मिक्स करून केसांना लावा.
4. मुलतानी मातीचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी मुलतानी माती, अंडी आणि मध लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करून आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे आपला चेहरा सुंदर होईल.
5. चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी आपण घरच्या घरी मुलतानी मातीचा फेसपॅक तयार करू शकतो. यासाठी मुलतानी माती एक चमचा, हळद आणि खोबरेल तेल लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास मदत होईल.
6. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आपण मुलतानी मातीचा फेसपॅक वापरू शकतो. यासाठी मुलतानी, दही, हळद लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण वीस मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Multani soil is beneficial for skin and hair)