मुंबई : आपण सर्वांनी मशरूमपासून बनवलेले अनेक प्रकारचे पदार्थ नक्कीच खाल्ले असतील. भाज्यांपासून पिझ्झापर्यंत अनेक प्रकारच्या चवदार खाद्यपदार्थ बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. मशरूममध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण तुम्हाला माहिती आहे का? की मशरूम त्वचेचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते.
(Mushroom face pack is beneficial for the face)
हे त्वचेचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत. जे त्वचेची समस्या दूर करण्यास मदत करतात. आपण ते पावडर स्वरूपात वापरू शकता. उन्हाळ्यात मशरूम त्वचा थंड करते. तसेच त्वचा तरुण ठेवण्यास मदत होते. याशिवाय मुरुमांच्या समस्येपासून सुटका मिळते. मशरूम फेसपॅक का वापरला जातो. हे आपण बघूयात.
मशरूम पावडरचा वापर फेसपॅक बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. तुम्हाला हे कोणत्याही किराणा किंवा वैद्यकीय दुकानात सहज मिळेल. मशरूममध्ये व्हिटॅमिन बी, सेलेनियम, कॉपर आढळतात. यामुळे त्वचा चमकदार दिसते. आजकाल मशरूमचा वापर क्रीम, लोशन आणि सीरममध्ये केला जात आहे. त्याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी होतात.
साहित्य
-मशरूम पावडर – 1 टेस्पून
-ओट्स – 1/3 कप
-लिंबाचा रस – 2 टेस्पून
-व्हिटॅमिन ई कॅप्सूल – 1
कृती
प्रथम ओट्स आणि मशरूममध्ये पाणी मिसळून पेस्ट तयार करा. मग त्यामध्ये लिंबाचा रस, व्हिटॅमिन ई कॅप्सूल चांगले मिसळा. हा फेसपॅक हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट सुमारे 15 ते 20 मिनिटे ठेवा आणि आपला चेहरा पाण्याने धुवा. यानंतर चेहऱ्यावर कोरफड जेल लावा. चांगले परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा वापरू शकता.
‘व्हिटामिन डी’ शरीरासाठी खूप महत्वाचा घटक आहे. शरीरात ‘व्हिटामिन डी’ची कमतरता असल्यास बरेच आजार उद्भवतात. नैसर्गिकरित्या ‘व्हिटामिन डी’ आढळणाऱ्या भाज्या आणि फळे तशी कमीच आहेत. यापैकीच एक भाजी आहे मशरूम. मशरूममध्ये ‘व्हिटामिन डी’ मुबलक प्रमाणात आढळते. दररोज मशरूम खाल्ल्याने शरीराला आवश्यक तितके ‘व्हिटामिन डी’ नैसर्गिकरित्या मिळू शकते. ‘पांढरे मशरूम’ आणि ‘पोर्टेबेला मशरूम’मध्ये ‘व्हिटामिन डी’ चांगल्या प्रमाणात आढळते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
(Mushroom face pack is beneficial for the face)