‘हे’ ड्रायफूट ठरु शकते त्वचेसाठी वरदान, फायदे वाचल्यानंतर लगेचच वापराल

| Updated on: Dec 01, 2024 | 5:34 PM

बदाम त्वचेसाठी अद्भुत आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन ई त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चराइझ करते आणि ती कोमल आणि चमकदार बनवते. रोज चार-पाच भिजवलेले बदाम खाणे त्वचेसाठी फायदेशीर आहे.

हे ड्रायफूट ठरु शकते त्वचेसाठी वरदान, फायदे वाचल्यानंतर लगेचच वापराल
ड्रायफ्रूट्स
Follow us on

बदाम खाणं आरोग्यासाठी अत्यंत चांगलं आहेत. शरीरासाठी त्याचे असंख्य फायदे होतात. तुमचा मेंदू तल्लख होतो. पण बदामचा तेवढाच उपयोग नाही. या सुपरफूडमुळे तुमची त्वचाही सुंदर होते. तुम्ही सुंदर दिसू लागता. कारण बदाममधील पोषक तत्त्व आणि व्हिटॅमिन्स त्वचा उजळते. हायड्रेट ठेवण्यासाठी आणि अनेक समस्या दूर करण्यासाठी बदामचा उपयोग होतो. त्यामुळे आपली त्वचा ग्लोइंग बनून हेल्दीही बनते. थंडीच्या दिवसातही बदामामुळे तुमचीही त्वचा ग्लोइंग होऊ शकते. तुम्ही हवं तर रोज सकाळी भिजलेले बदाम खा. बदामाचं तेलही त्वचेला लावू शकता. किंवा फेसपॅकच्या रुपात तुम्ही बदामाचा वापर करू शकता. एकूण काय तर बदाम स्कीनसाठी वरदान आहे. तुम्ही त्याचा वापर केल्यास तुम्हाला असंख्य फायदे झाल्याशिवाय राहणार नाही.

त्वचेला मॉइश्चराइज करतो

बदामामध्ये व्हिटॅमिन E असतं. त्यामुळे त्वचेला नैसर्गिकपणे मॉइश्चराइज करण्यास मदत होते. बदाम त्वचेला खोलवर पोषण देते. यामुळे सुरकुतलेल्या त्वचेला नवसंजीवनी मिळते. जर तुम्ही बदामाचे तेल चेहऱ्यावर लावले तर तुमची त्वचा सौम्य आणि मऊ होईल.

डाग गायब होतील

नियमितपणे बदामाचे तेल चेहऱ्यावर लावल्याने डाग कमी होतात. याशिवाय, बदामाचे तेल त्वचेमध्ये पिगमेंटेशन कमी करण्यास देखील मदत करते. तुम्ही बदामाचं दूध किंवा पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे त्वचा गुळगुळीत होऊन तेज येतं.

चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो

दररोज बदाम खाल्ल्याने त्वचेला आतून पोषण मिळते. त्यामुळे त्वचा नैसर्गिकपणे उजळते. तुम्ही बदामाचे फेसपॅक तयार करूनही त्वचेला उजळवू शकता. तुम्ही दर आठवड्यात दोन वेळा हे फेसपॅक वापरू शकता.

सन्स्क्रीनचा काम

बदाम त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो. बदामामध्ये व्हिटॅमिन E सारखे घटक असतात, जे त्वचेवर एक संरक्षक थर तयार करतात. यामुळे टॅनिंग आणि सनबर्नपासून बचाव होतो.

कोरडेपणा दूर

बदामामध्ये व्हिटॅमिन E, ओमेगा-3 सारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे त्वचेला सौम्य आणि मऊ बनवतात. यामुळे त्वचेला चमक येते. जर तुम्ही रोज चार ते पाच भिजवलेले बदाम खाल्ले, तर तुमच्या चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होईल.