मुंबई : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. विशेष म्हणजे काही फळांच्या फेसपॅकमुळे देखील आपण आपली त्वचा सुधारू शकतो. (Papaya and banana face packs are beneficial for the skin)
पपईत खनिज, पोषक तत्व आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. पपईमध्ये असलेले व्हिटामिन c, व्हिटामिन E आणि बीटा क्यारोटीनसारखे अँटी ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि व्हिटामिनमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. यामुळे आपण अधिक काळासाठी तरुण दिसू शकतो. केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. हे सर्व त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असतात.
केळी आणि पपईचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला अर्धी केळी, पपईचा लगदा आणि गुलाब पाणी लागणार आहे. सुरूवातीला पपईचा लगदा आणि अर्ध केळ घ्या आणि त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि चांगली पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. त्यानंतर ही पेस्ट सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
पपईची साल चेहऱ्याचा कोरडपणा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. सर्वात अगोदर पपईची साल वाळवावी आणि त्याची बारीक पावडर करा. दोन चमचे पपईच्या पावडरमध्ये एक चमचे ग्लिसरीन घाला आणि फेसपॅक चेहर्यावर लावा. फेसपॅक कोरडा झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. चेहर्यावर टॅनिंगची समस्या असल्यास ताज्या पपईची साल बारीक करून त्यात लिंबाचा रस मिसळा.
(टीप : कोणत्याही आहार बदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Running Side Effects | जास्त वेळ धावणे महिलांसाठी धोकादायक, आरोग्यास होऊ शकते हानी!
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!https://t.co/5d5zna9tBx#diabetes #Sugar #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2020
(Papaya and banana face packs are beneficial for the skin)