मुंबई : जीवनशैलीच्या (Lifestyle) चुकीच्या सवयींमुळे लोकांना त्वचेच्या अनेक समस्यांना समोरे जावे लागते. या त्वचेच्या समस्यांमध्ये टॅनिंग, मुरुम, पुरळ आणि पिंपल्स यांचा समावेश होतो. चेहऱ्यावर मुरुमांव्यतिरिक्त अनेकांना पाठीवर पुरळ आणि पिंपल्सची (Pimples) देखील समस्या निर्माण होते. ही पुरळ पाठीवर असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे थोडे कठीण होते. असे म्हटले जाते की या समस्येमुळे पाठदुखी सुरू होते, कारण पाठीचे मुरुम कपड्यांसह वारंवार घासतात. ही समस्या (Problem) टाळण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. हे घरगुती उपाय नेमके कोणते याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
पुदिना आणि कोरफड व्यतिरिक्त पाठीचे मुरुम दूर करण्यासाठी तुम्ही दालचिनीची मदत देखील घेऊ शकता. तज्ञांच्या मते, दालचिनी मुरुम किंवा पुरळ दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानली जाते. एका भांड्यात पुदीना आणि कोरफड घ्या आणि त्याची बारीक पेस्ट तयार करा. आता त्यात दालचिनी पावडर घाला आणि चांगले मिसळा. हे आपल्या पाठीवर लावा आणि कोरडे झाले की धुवा.
हे दोन्ही घटक पाठीवर लावल्याने मुरुमे तर दूर होतीलच. सोबतच त्वचेवरील खाज येण्याच्या समस्येवरही मात करता येते. पुदिन्याची काही पाने घेऊन पाण्याच्या साहाय्याने मिश्रण करा. या स्मूद पेस्टमध्ये दोन चमचे कोरफडीचे जेल टाका आणि पाठीच्या मुरुमांवर लावा. वीस मिनिटे ही पेस्ट पाठीवर राहूद्या. त्यानंतर थंड पाण्याने आपली पाठ धुवा.
पुदिना आणि कोरफड व्यतिरिक्त, पाठीचे पुरळ दूर करण्यासाठी तुम्ही कॉफीची मदत देखील घेऊ शकता. यासाठी दोन चमचे कॉफी पावडर घ्या आणि त्यात मध आणि दही मिसळा. आता ही पेस्ट पाठीवर लावा. त्यानंतर काही वेळ मसाज करा. त्यानंतर पाठीवर सोडून 10 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
Food | साखरेऐवजी या नैसर्गिक गोड पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा, आरोग्याला अनेक फायदे होतील!
Health | उन्हाळ्याच्या हंगामामध्ये किती ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा सविस्तरपणे!