मुंबई : सध्याच्या हंगामात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण या हंगामात आपली त्वचा कोरडी पडते. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि सुरकुत्या येण्याची शक्यता असते. चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या क्रिम वापरण्यापेक्षा आपण नेहमीच घरगुती उपाय केले पाहिजेत. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. (Potato, rose water and honey face pack is beneficial for the skin)
चेहऱ्यावरील कोरडेपणा दुर करण्यासाठी आपण बटाटा, गुलाब पाणी आणि मधाचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावू शकता. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपण चार चमचे बटाट्याचा रस, मध आणि गुलाब पाणी मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
हा फेसपॅक आपण आठवड्यातून चार वेळा लावला पाहिजे. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तुम्हाला कोरड्या त्वचेची समस्या असेल तर बटाट्याचा वापर करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता. यासाठी बटाटा किसून घ्या. आता किसलेल्या बटाट्यात दोन थेंब ग्लिसरीन, दोन थेंब गुलाबपाणी, अर्धा चमचा तांदळाचे पीठ, अर्धा चमचे मध सर्व टाकल्यानंतर ही पेस्ट व्यवस्थित मिसळून द्या. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा आणि नंतर चेहरा धुवा.
आपण हा पॅक सतत 1 आठवड्यासाठी आपल्या त्वचेवर लावा आणि मग आपणास चेहऱ्यावर फरक जाणवेल. जर, तुमची त्वचा कोरडी असेल, तर मसूर डाळीची पूड, गुलाब पाणी आणि दूध रात्रभर भिजवून ठेवून, सकाळी बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट जवळपास 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. हा फेस पॅक वापरल्याने तुमची त्वचा चमकदार बनेल. मध आपली त्वचा मॉइश्चराइझ करतो. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मध आणि मसूर डाळ यांची पेस्ट तयार करा.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Potato, rose water and honey face pack is beneficial for the skin)