मुंबई : आपल्या सर्वांना मनुका आवडतो. द्राक्षे सुकवून मनुके तयार केले जातात. हे पोषण आणि अनेक आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जाते. यामध्ये रसायनांचा वापर केला जात नाही. द्राक्षानंतर मनुके तयार केली जातात. मनुका आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. आपण त्वचेसाठी मनुक्याचे विविध फेसपॅक तयार करून लावू शकता. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते. (Raisin Face Mask Extremely beneficial for the skin)
मनुक्याचा फेसमास्क
आतापर्यंत तुम्हाला समजले असेल की मनुका आपली त्वचा सुधारण्यास कशी मदत करू शकतो. मनुका फेसमास्क नियमितपणे लावल्याने तुम्हाला निर्दोष आणि तरुण त्वचा मिळण्यास मदत होऊ शकते. मनुका फेसमास्क कसा बनवायचा ते जाणून घेऊया.
-मनुका
-टी ट्री ऑईल
-लिंबाचा रस
-कोरफड
-मुलतानी माती
-पध्दत
एका वाडग्यात सर्व साहित्य घ्या आणि ते एकत्र करा. नंतर त्यांना ग्राइंडरमध्ये फिरवून ठेवा आणि त्याची जाड पेस्ट बनवा. जर पेस्ट जाड आणि कोरडी असेल तर आपण त्यात थोडे गुलाब पाणी घालू शकता. आपल्या बोटांचा वापर करून, स्वच्छ चेहऱ्यावर फेस मास्क लावा आणि मसाज करा. 25 मिनिटांसाठी चेहऱ्यावर सोडा आणि पाण्याने धुवा.
हा फेसपॅक करण्यासाठी खूप सोप्पा असल्यामुळे आपण दररोज देखील हा फेसपॅक चेहऱ्याला लावू शकतो. मध, चंदन पावडर आणि साखरेचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी मध आणि चंदन पावडर मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये शेवटी साखर मिक्स करा आणि ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा. त्यानंतर त्वचेचा मसाज करा आणि कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतील ‘ही’ योगासने, तुम्हीदेखील नक्की ट्राय करा!#beautytips | #skincare | #yoga | #beauty https://t.co/zqbiogPSVT
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
(Raisin Face Mask Extremely beneficial for the skin)