मुंबई : रीठा एक औषधी वनस्पती आहे. हे औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. केसांना मऊ आणि सुंदर बनवण्यासाठी अनेक वर्षांपासून रीठाचा वापर केला जातो. रीठा केसगळती रोखण्यास मदत करते. हे नैसर्गिकरित्या कार्य करते. आवळा आणि शिकाकाई सोबत रीठा वापरू शकता. हे टाळूला पोषण करण्यासाठी आणि केस गळणे कमी करण्यासाठी ओळखले जाते. (Reetha beneficial for shiny hair)
रीठा ही एक औषधी वनस्पती आहे, ज्यात लोहाचे प्रमाण अधिक आहे. लोह आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त घटक आहे. रीठात असलेले अँटी-ऑक्सिडेंट्स आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. इन्व्हेस्टिगेटिव्ह डर्मेटोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, रीठा एक उत्कृष्ट क्लिनिंग एजंट आहे, जो आपल्या केसांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवतो.
रीठा आणि खोबरेल तेल – सर्वप्रथम 100 मिली खोबरेल तेल 5 मिनिटे गरम करा. त्यात मूठभर रीठा आणि आवळा घाला. सर्वकाही चांगले मिसळा आणि 1 दिवसासाठी सोडा. हे तेल नियमित वापरा.
रीठा आणि मेहंदी – 3 टिस्पून कोरडा रीठा, 3 टिस्पून मेंदी पावडर घ्या, पेस्ट बनवण्यासाठी मिक्स करा. या पेस्टने केसांवर काही वेळ चांगली मालिश करा. 10-15 मिनिटे असेच राहू द्या. त्यानंतर सौम्य शैम्पूने ते धुवा.
रीठा आणि अंडी – हा पॅक तयार करण्यासाठी दोन अंडी घ्या. आवळ्याची वापडर दोन चमचे घ्या. दोन चमचे कोरडा रीठा घ्या. शिकाकाईचे दोन चमचे घ्या. पेस्ट तयार करण्यासाठी सर्वकाही मिक्स करा. हलक्या हातांनी डोक्यावर मसाज करा. 30 मिनिटे असेच राहू द्या. यानंतर डोके सौम्य शैम्पूने धुवा. आपण आठवड्यातून 3 वेळा वापरू शकता.
रीठा हेअर पॅक – हे बनवणे खूप सोपे आहे. सुमारे तीन चमचे रीठा पावडर घ्या आणि त्यात पाणी घालून पेस्ट बनवा. मिश्रणात एक चमचा लिंबाचा रस दोन चमचे दही मिसळा. ते टाळूवर आणि केसांवर लावा. 15-20 मिनिटांनंतर ते धुवा. आपण आठवड्यातून 3-4 वेळा हे वापरू शकता. निर्जीव केसांसाठी हा एक उत्तम हेअर पॅक आहे.
रीठाचे फायदे
1. डोक्यातील कोंडा प्रतिबंधित करते – रीठा कोंडा टाळण्यास मदत करते. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहे. जे टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
2. अँटीफंगल – रीठामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशीविरोधी गुणधर्म आहेत. त्याचा नियमित वापर टाळूचे संक्रमण रोखण्यास मदत करतो. हे केस आणि टाळू पूर्णपणे स्वच्छ करण्यास मदत करते.
3. रीठा एक नैसर्गिक कंडिशनर आहे. जी टाळूला शांत करते आणि केसांना चमकदार बनवते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Reetha beneficial for shiny hair)