मुंबई : केशर हे अनेक गुणांनी समृद्ध आहे आणि त्याला खूप महत्त्व देखील आहे. स्वयंपाक घरात केशरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. केशरचा उपयोग शतकानुशतके खाण्याची चव वाढवण्यासाठी आणि त्वचा सुंदर करण्यासाठी केला जातो. आपण त्वच्या सुंदर करण्यासाठी साैदर्य उत्पादने वापरण्यापेक्षा त्वचेसाठी केशर वापरले पाहिजे. यामुळे आपली त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते. (Saffron is extremely beneficial for the skin)
1. मुरुम
साहित्य
केशर दोन चमचे
3 चमचा एलोवेरा जेल
अर्धा चमचा हळद
प्रक्रिया :
केशर चांगले बारीक करून घ्या आणि त्यामध्ये 3 चमचा एलोवेरा जेल, अर्धा चमचा हळद मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्यावर आणि मानेवर लावा. त्यानंतर चेहऱ्याची मालिश करा. 20 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.
2. पिगमेंटेशन
साहित्य
1 चमचा केशर
3 चमचे पपईचा लगदा
1 चमचा दही
प्रक्रिया :
वरील सर्व गोष्टी मिसळून जाड पेस्ट तयार करा. हे मिश्रण क्लीन्सर म्हणून चेहरा आणि मानेवर लावा. त्यानंतर पेस्ट कोरडी होईपर्यंत तशीच ठेवा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा.
3. कोरडी त्वचा
साहित्य
केशर अर्धा चमचा
3 चमचा मॅश केलेले केळी
एक चमचा दूध
प्रक्रिया :
एका भांड्यात केशर आणि इतर गोष्टी मिसळून जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
केशर आणि दुधाचा फेसपॅक
त्वचेचा रंग उजळवण्यासाठी केशर आणि दुधाचा फेसपॅक लावा. यासाठी तुम्हाला थोडे केशर रात्रभर भिजवावे लागेल आणि त्यामध्ये दुध मिसळा त्यानंतर सकाळी ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा. 20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Saffron is extremely beneficial for the skin)