मुंबई : कोरड्या आणि निर्जीव त्वचेची (Skin) समस्या वाढत आहे. हवामानातील बदल, उन्हामुळे होणारे त्वचेची नुकसान यामुळे त्वचा कोरडी होते आहे. मात्र, काही घरगुती उपाय करूनही आपण कोरड्या त्वचेची समस्या (Problem) दूर करू शकतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, चंदन आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. पिंपल्स, काळे डाग आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी चंदन (Sandalwood) अत्यंत फायदेशीर आहे. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी चंदन नेमके कसे वापरावे हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
चंदन पावडर आणि दुधाचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे चंदन पावडर आणि थोडे कच्चे दूध लागेल. हे दोन्ही एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांसाठी त्वचेवर राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.
एका भांड्यात 2 चमचे चंदन पावडर घ्या. त्यात पुरेसे गुलाब पाणी टाका. त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 20 मिनिटे त्वचेवर ही पेस्ट राहू द्या. त्यानंतर हाताने मसाज करा. याने त्वचा एक्सफोलिएट करा. हे छिद्रांमधील घाण काढून टाकण्यास मदत करेल. त्यानंतर ते साध्या पाण्याने धुवा. आपण आठ दिवसातून 3 वेळा हा फेसपॅक वापरू शकतो.
एका भांड्यात 2 चमचे चंदन पावडर घ्या. त्यात लिंबाचा रस आणि मध घालून चांगले मिसळा आणि हा पॅक चेहरा आणि मानेवर लावा. मात्र, लिंबाचा रस एक चमचापेक्षा अधिक नको. दहा मिनिटे हा पॅक आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. आठ दिवसातून दोनदा हा पॅक आपण चेहऱ्यावर वापरू शकता.
चंदन पावडर आणि दह्याचा फेसपॅक उन्हाळ्याच्या हंगामामध्ये अधिक फायदेशीर ठरतो. कारण या फेसपॅकमुळे त्वचेवरील टॅन काढण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला दही आणि एक चमचा चंदन पावडर लागेल. ते एकत्र मिसळा आणि संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. त्वचेवर 20 मिनिटे ठेवा आणि त्यानंतर ते पाण्याने धुवा आणि तुम्ही 2 ते 3 करू शकता.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)