Cleanser : तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती क्लिंजर अत्यंत फायदेशीर!
तेलकट त्वचा (Oily skin) असलेल्या लोकांना त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अतिरिक्त सीबम बाहेर पडल्यामुळे त्वचेवर मुरुम येण्याची समस्या देखील निर्माण होते. तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी त्वचेची (Skin) अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तेलकट त्वचेसाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे क्लिन्झर वापरतात.
त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स फाॅलो करा.
Image Credit source: TV9
Follow us on
मुंबई : तेलकट त्वचा (Oily skin) असलेल्या लोकांना त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अतिरिक्त सीबम बाहेर पडल्यामुळे त्वचेवर मुरुम येण्याची समस्या देखील निर्माण होते. तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी त्वचेची (Skin) अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तेलकट त्वचेसाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे क्लिन्झर वापरतात. यामुळे तुमच्या त्वचेला खूप नुकसान होऊ शकते. तेलकट त्वचेसाठी तुम्ही घरच्या घरी क्लिंजर (Cleanser) बनवू शकता. हे घरच्या घरी सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून बनवले जातात. चला तर जाणून घेऊयात क्लिंजर कसे तयार करायचे.
क्लिंजर तयार करण्यासाठी मुलतानी माती घ्या. त्यामध्ये तांदळाचे पीठ आणि बेसन चांगले मिक्स करा. त्यात मध, एक चमचा लिंबाचा रस आणि काकडीचा रस घाला. ते एकत्र चांगले मिसळा. ते संपूर्ण चेहऱ्यावर तसेच मानेला लावा आणि मसाज करा. 5 ते 10 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.
मुलतानी माती त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. मुलतानी माती छिद्रांमधील घाण साफ करण्याचे काम करते. त्यामुळे पुरळ येण्याची शक्यता कमी होते. मुलतानी मातीचा नियमित वापर केल्याने आपली त्वचा सुधारण्यास मदत होते. मुलतानी माती त्वचेतील रक्त परिसंचरण सुधारू शकते.
तेलकट त्वचेसाठी बेसन खूप फायदेशीर आहे. बेसन मुरुम, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स इत्यादीपासून बचाव करते. हे त्वचेचे पीएच संतुलन राखण्यास मदत करते. हे सीबम उत्पादन नियंत्रित करते. बेसन छिद्रांना खोलवर साफ करते आणि साचलेली घाण आणि धूळ काढून टाकते. यामुळे त्वचा स्वच्छ राहते.
मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी सेप्टिक गुणधर्म असतात. यामुळे मध आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. काकडीत 90 टक्के पाणी असते. त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम काकडी करते. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड असते. हे त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे आणि घाण काढून टाकण्याचे काम करते. यामुळेच मध, लिंबू आणि काकडी आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर घटक आहेत.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)