मुंबई : हंगाम कोणत्याही असो…सनस्क्रीन त्वचेला (Skin) लावणे खूप जास्त फायदेशीर आणि महत्वाचे आहे. बऱ्याच लोकांना असे वाटते की उन्हामुळे आणि उष्णतेमुळे चेहऱ्यावर सनबर्न किंवा टॅनिंग (Tanning) होते. यामुळे सनस्क्रीन लावणे टाळले पाहिजे. मात्र, तुम्ही चूक आहात. कारण हंगाम कोणताही असो बाराही महिने त्वचेला सनस्क्रीन (Sunscreen) लावणे गरजेचे आहे. जे लोक नेहमी सनस्क्रीन वापरतात, त्यांना त्वचेच्या अधिक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ कधीही येत नाही. कारण सनस्क्रीनमुळे त्यांची त्वचा अधिक सुरक्षित राहण्यास मदत होते.
लोकांना असे वाटते की त्यांनी सनस्क्रीन लावले तर त्यांची त्वचा अधिक चांगली होईल. तर हा विचार चुकीचा आहे. यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. सनस्क्रीन लावल्यानंतर अर्ध्या तासाने घराबाहेर पडावे. सनस्क्रीन लावल्यानंतर लगेच घराबाहेर पडल्यास त्याचा परिणाम होत नाही. यामुळेच दररोज सकाळी अंघोळ केल्यावर लगेचच आपल्या त्वचेवर सनस्क्रीन लावणे फायदेशीर ठरते.
सनस्क्रीनवर दिलेली एसपीएफ पातळी महत्त्वाची भूमिका बजावते. तज्ञांच्या मते लोकांनी उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेताना जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन निवडले पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, सनस्क्रीन घेणे कधीही अधिक फायदेशीर ठरते. बरेच लोक मनाने सनस्क्रीन विकत घेतात आणि त्यांना स्वत: च्या त्वचेचा टोन देखील माहिती नसतो. मग अशावेळी सनस्क्रीन लावल्यानंतर त्वचेच्या समस्या वाढण्याची शक्यता निर्माण होते.
बाजारामध्ये अनेक प्रकारचा सनस्क्रीन मिळतात. मात्र, आपल्या त्वचेच्या प्रकारानुसारच सनस्क्रीन वापरणे फायदेशीर आहे. लोक त्वचेच्या प्रकाराकडे लक्ष देत नाहीत आणि अशा स्थितीत त्यांच्या त्वचेवर मुरुम येण्याची समस्या उद्भवते. बऱ्याचवेळा चुकीच्या प्रकारची सनस्क्रीन लावल्याने आपली त्वचा कोरडी देखील पडू शकते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्यासाठी जेल बेस्ड सनस्क्रीन लावू नका. तुम्हाला हवे असल्यास मॅट फिनिश सनस्क्रीन वापरू शकता.
संबंधित बातम्या :
Skin | उन्हाळ्यात तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी हे 4 घरगुती स्क्रब अत्यंत फायदेशीर…
Weight Loss Tips : वजन कमी करायचे आहे? मग फक्त या 5 टिप्स फाॅलो करा!