मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, लिंबू (Lemon) आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबाचा दररोजच्या आहारामध्ये समावेश केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढण्यास मदत होते. इतकेच नाहीतर लिंबू हे आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. लिंबाच्या मदतीने आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. लिंबू मुरुम आणि सुरकुत्या दूर करण्याचे काम करते. तुम्ही त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी अनेक प्रकारे वापरू शकता. तुम्ही लिंबूमध्ये अनेक नैसर्गिक घटक मिसळून त्वचेवर वापरू शकता. लिंबूपासून बनवलेले फेसपॅक त्वचेला ग्लो देतात आणि मुरूमाची समस्याही दूर करतात.
लिंबू आणि मध हे दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहेत. एक चमचे मध आणि लिंबाचा रस मिसळा. या गोष्टी मिसळून फेसपॅक बनवा. आता हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. वीस मिनिटांनी चेहऱ्याचा चांगला मसाज करा. यामुळे त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल. हा उपाय आपण आठ दिवसातून दोनदा करायला हवा.
लिंबू आणि दह्याचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. यासाठी एका भांड्यात एक छोटा चमचा दही टाका. त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा, काही वेळ त्वचेला मसाज करा. 10 ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.
त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी ग्लिसरीन फायदेशीर ठरते. फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी हे चांगले आहे. लिंबू आणि ग्लिसरीनचा फेसपॅक तयार करण्यासाठी ग्लिसरीन, लिंबाचा रस आणि पाणी समान प्रमाणात मिसळा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच मानेला लावा. याने त्वचेला काही वेळ मसाज करा, 10 ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या, त्यानंतर साध्या पाण्याने त्वचा धुवा. हे तुमच्या त्वचेवरील टॅन काढून टाकण्याचे काम करते.
हळद आरोग्य, शरीर, आणि त्वचा सर्वांसाठीच फायदेशीर आहे. चिमूटभर हळद घेऊन त्यात लिंबाचा रस मिक्स करा. त्यात थोडे साधे पाणी टाका. या गोष्टी नीट मिसळा आणि पेस्ट बनवा. हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर तसेच मानेवर लावा. हा फेसपॅक त्वचेवर 15 ते 20 मिनिटे राहू द्या, नंतर साध्या पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होऊ शकते. आपण आठ दिवसातून तीन वेळा हा पॅक वापरायला हवा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)