Skin care : त्वचेच्या या समस्या दूर करण्यासाठी कच्च्या हळदीचा एक तुकडाच फायदेशीर!

| Updated on: Apr 09, 2022 | 9:09 AM

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, हळद (Turmeric) आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. प्राचीन काळापासून उपचारासाठी हळद वापरली जाते. हे केवळ आरोग्यच नाही तर त्वचेच्या (Skin) अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर आहे. यामध्ये अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म आहेत. हवेतील घाण त्वचेवर पटकन जमा होते.

Skin care : त्वचेच्या या समस्या दूर करण्यासाठी कच्च्या हळदीचा एक तुकडाच फायदेशीर!
त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी कच्ची हळद फायदेशीर
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, हळद (Turmeric) आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. प्राचीन काळापासून उपचारासाठी हळद वापरली जाते. हे केवळ आरोग्यच नाही तर त्वचेच्या (Skin) अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर आहे. यामध्ये अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म आहेत. हवेतील घाण त्वचेवर पटकन जमा होते. यामध्ये असलेल्या बॅक्टेरियामुळे त्वचेवर पिंपल्स (Pimples) येण्यासही सुरूवात होते. जे तुम्ही हळदीने दूर करू शकता. हळदीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट असतात, जे त्वचेला आतून दुरुस्त करतात. हळद आपल्या त्वचेसाठी आपण कशी वापरू शकता हे आपण बघूयात.

चमकदार त्वचा

प्रदूषण आणि सूर्याच्या तीव्र किरणांमुळे चेहऱ्यावरचा रंग नाहीसा होऊ लागतो. कच्च्या हळदीचा वापर करून आपण चेहऱ्यावरील चमक परत मिळू शकतो. तुम्हाला कच्च्या हळदीचा रस घ्यावा लागेल आणि त्यात थोडे दूध किंवा दुधावरची साय घालावी लागेल. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने तुम्हाला त्वचेवर फरक दिसू शकतो.

चेहऱ्यावरील सुरकुत्या

वाढत्या प्रदूषणामुळे आणि ताणतणावांमुळे लोकांना लहान वयातच त्वचेवर सुरकुत्या पडण्याची समस्या होऊ लागली आहे. सुरकुत्या सहजासहजी दूर होत नाहीत, मात्र कच्च्या हळदीशी संबंधित उपाय केल्यास त्यावर बऱ्याच अंशी मात करता येते. यासाठी कच्च्या हळदीच्या रसात बदाम पावडर आणि कच्चे दूध मिसळा. हा फेस मास्क लावा आणि सुमारे 15 मिनिटे राहू द्या. मास्क सुकल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा. आपल्याला त्वचेच्या काळजीमध्ये ही पद्धत नियमितपणे पाळावी लागेल.

स्ट्रेच मार्क्स

बहुतेक महिलांना गर्भधारणेनंतर शरीरात स्ट्रेच मार्क्सची समस्या निर्माण होते. तसेच व्यायामामुळे किंवा जिममध्ये वर्कआउट केल्यामुळे स्ट्रेच मार्क्स येतात. ते दूर करण्यासाठी तुम्ही कच्च्या हळदीची मदत घेऊ शकता. कच्च्या हळदीचा रस घ्या आणि त्यात लिंबू आणि ऑलिव्ह ऑइल टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. ते काढण्यासाठी फक्त साधे पाणी वापरा.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

तुम्हाला मधुमेह असेल आणि साखरेची पातळी वाढत असेल तर इकडे लक्ष द्या; ही एक गोष्ट खाल्ल्याने शुगर लेव्हल कमी होणार

पन्नाशी ओलांडल्यानंतरही मिलिंद सोमणसारखं फिट राहायचंय? तर वाचा त्याने दिलेला हा लाखमोलाचा सल्ला