मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कोरफड आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेसाठीही (Skin) अत्यंत फायदेशीर आहे. त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी कोरफड गुणकारी मानली जाते. कोरफड त्वचेला चमकदार बनविण्यास मदत करते, त्वचेला हायड्रेट (Hydrate) करते. ते कोरडी त्वचा मऊ करते. तसेच कोरफड त्वचेला तेलकट न करता मॉइश्चरायझ आणि हायड्रेट करण्यास मदत करते. कोरफडमुळे (Aloevera) कोलेजनची पातळी वाढण्यास मदत होते, त्वचेसाठी कोरफडीचा वापर विविध मार्गांनी करता येतो. जर आपण दररोज चेहऱ्याला कोरफड लावली तर त्वचेची कुठलीच समस्या आपल्याला होणार नाही.
कोरफड जेलमध्ये तांदळाचे पीठ मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेवर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील टॅनची समस्या दूर होईल.
कोरफड जेल आणि गुलाब पाणी समान प्रमाणात मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि त्वचेला काही वेळ मालिश करा. 15 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या, त्यानंतर ओल्या टॉवेलने स्वच्छ करा, त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत होईल.
एक चमचा कोरफड जेल घ्या. त्यात एक चमचा मध घाला, हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर तसेच मानेवर लावा. त्वचेला मसाज करा. 15 ते 20 मिनिटे असेच राहू द्या, नंतर साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा ते वापरू शकता. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या कायमची दूर होईल.
एक चमचा कोरफड जेल घ्या. त्यात लिंबाचा रस मिसळा एकत्र करा. हा फेस मास्क चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. त्वचेला मसाज करा आणि 15 ते 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर ते साध्या पाण्याने धुवा, तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा करून त्वचेच्या सर्व समस्या दूर करू शकता.
हा मास्क खाज आणि टॅनची समस्या दूर करण्यास मदत करू शकतो. हा मास्क त्वचेला हायड्रेशनला करतो. यासाठी 1 कप कोरफड जेल, 2 चमचे अॅपल सायडर व्हिनेगर आणि 1 चमचे मध लागेल. हे सर्व साहित्य एकत्र करा आणि चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनी थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Health Care Tips : बेलाच्या फळाचा ज्यूस आरोग्यासाठी वरदानच, जाणून घ्या 5 मोठे फायदे!
Weight Loss : हे खास पेय पिऊन फक्त 1 आठवड्यामध्ये झटपट वजन कमी करा!