मुंबई : हिवाळयाच्या हंगामात केस आणि त्वचा जास्त प्रमाणात कोरडी होते. कोरड्या हंगामाची सुरुवात केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर केसांसाठीही कठीण असते. बदलत्या ऋतूंच्या अनुषंगाने स्किनकेअर रूटीनसोबतच, केसांची निगा राखण्यासाठी आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणात उष्णता आणि आर्द्रतेचे प्रमाण कमी होत असल्याने आपल्याला आपल्या केसांची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. ज्या तुम्ही फाॅलो करून केसांची काळजी घेऊ शकता.
सल्फेट मुक्त शैम्पू
हवामान जितके कोरडे होईल तितके केस कोरडे होतात. केसांचा कोरडेपणा टाळण्यासाठी तुम्हाला एक मॉइश्चरायझिंग शैम्पू आवश्यक आहे. जो हायड्रेटिंग आणि ऑर्गेनिक दोन्ही आहे.
डीप कंडिशनर
हलके कंडिशनर उन्हाळ्यासाठी योग्य होते. परंतु हिवाळ्यात डीप कंडिशनर आवश्यक असते. जोजोबा, नारळ यांसारखे तेल असलेले कंडिशनर निवडा जे तुम्हाला चांगले हायड्रेशन देते.
तेल लावा
तेल कोरडेपणाचा सामना करू शकते आणि आपले केस मजबूत करू शकते. तसेच यामुळे स्प्लिट एंड्स दुरुस्त करू शकते. नियमित तेल लावल्याने टाळू कोरडी होण्यापासून बचाव होतो.
सीरम वापरा
हिवाळा तुमचे केस कोरडे आणि निर्जीव बनवतो. यामुळे तुम्ही स्टाइलिंग साधने केसांसाठी वापरत राहिल्यास केस तुटणात. परंतु जर तुम्हाला केसांचे नुकसान कमी करायचे असेल तर तुम्ही केसांना सीरम वापरा.
हेअर मास्क
चांगल्या कंडिशनिंगसाठी हेअर मास्क वापरणे फायदेशीर आहे. अंडी, मध किंवा दही यांसारख्या नैसर्गिक घटकांसह मॉइश्चरायझिंग हेअर मास्क निवडा. हे पौष्टिक आणि हायड्रेटिंग दोन्ही आहे आणि त्याच वेळी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Special tips to take care of hair in the changing seasons)