पावसाळ्याच्या हंगामात हायड्रेट केस हवेयत? मग ‘हा’ उपाय करा!

| Updated on: Aug 03, 2021 | 1:42 PM

केस सुंदर मिळवण्यासाठी केसांची काळजी घेणे तेवढेच महत्वाचे आहे. निरोगी केस मिळवण्यासाठी आपण केसांना हेअर मास्क लावले पाहीजे.

पावसाळ्याच्या हंगामात हायड्रेट केस हवेयत? मग हा उपाय करा!
सुंदर केस
Follow us on

मुंबई : केस सुंदर मिळवण्यासाठी केसांची काळजी घेणे तेवढेच महत्वाचे आहे. निरोगी केस मिळवण्यासाठी आपण केसांना हेअर मास्क लावले पाहीजे. तसेच आपल्यापैकी बरेच लोक केस धुताना बऱ्याच चुका करतात. ज्यामुळे आपले केस चांगले होण्यापेक्षा अधिक खराब होतात. ज्यामुळे केस तुटणे आणि केस गळण्याच्या समस्या देखील निर्माण होतात. जर सुंदर केस पाहिजे, असतील तर काही घरगुती उपाय केले पाहिजेत. (Take this measure to keep hair hydrated during the rainy season)

तूप आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तूपामुळे आपले केस सुंदर होण्यास मदत होते. तूप केसांना हायड्रेट करते. केसांमध्ये ओलावा कमी झाल्यामुळे केस निस्तेज व खराब होतात. अशा केसांसाठी तूप उत्तम उपाय आहे. त्यात आढळणारे हेल्दी फॅटी अॅसिड स्कल्पचे पोषण करून केसांच्या मुळांना हायड्रेट करतात. ज्यामुळे केस मऊ होतात.

जर तूप थेट केसांवर लावले तर तूपाचा चिकटपणा केसांचा पोत सुधारते. एक चमचा तूप गरम करा आणि नंतर आपल्या बोटाने डोके आणि केसांच्या मुळांवर हळुवारपणे लावा. काही तासांनंतर शॅम्पूने डोके धुवा. तूप स्प्लिट एण्ड्सचे पोषण करते, जे मुळात कमकुवत असतात. व्हिटॅमिन ए, डी, के 2, ई आणि अँटिऑक्सिडेंट्स सारख्या पोषक द्रव्यांसह समृद्ध तूप आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे.

रात्रभर केसांची सखोल कंडिशनिंग करायची असेल तर आपल्या केसांना तूप लावा. मग शॉवर कॅपने डोके झाकून सकाळी उठून आपले केस धुवा.बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची वाढ होत नसेल तर तूपात आवळा आणि कांद्याचा रस मिसळा आणि मालिश करा. यामुळे आपले केस सुंदर आणि चमकदार दिसण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा अथवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Take this measure to keep hair hydrated during the rainy season)