मुंबई : चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी आणि चेहरा चमकदार करण्यासाठी फेस स्टीम घेणे खूप महत्वाचे आहे. आपण आठवड्यातून एकदा फेस स्टीम घेतल्यास आपल्याला बरेच फायदे मिळू शकतात. रोमन आणि ग्रीक काळापासून चेहऱ्याला वाफ घेण्याची पध्दत आहे. तुमच्या चेहऱ्यावर मुरुम, सुरकुत्या किंवा ब्लॅकहेड्सची समस्या असल्यास आठवड्यातून एकदा स्टीम घ्यायलाच पाहिजे. (The tremendous benefits of taking Face Steam once a week)
1.चेहऱ्यावरील धूळ आणि घाण साफ करण्यासाठी स्टीमिंग हा एक चांगला पर्याय आहे. स्टीम घेतल्याने तुमची मृत त्वचा काढून टाकली जाते. छिद्र साफ होतात आणि आपली त्वचा श्वास घेण्यायोग्य होते.
2.जर आपण चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर आठवड्यातून दोनदा स्टीम घेणे आवश्यक आहे. ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी प्रथम 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर वाफ घ्या, नंतर स्क्रब करा.
3.स्टीम घेऊन तुमच्या चेहऱ्यावर येणारी उष्णता त्वचेच्या आतल्या रक्तवाहिन्यांचा विस्तार करते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावर ऑक्सिजनचा प्रवाह अधिक चांगला होतो. हे आपल्या त्वचेला ताजेपणा आणते आणि त्वचा चमकवते.
4.ज्यांचा चेहरा कोरडा आहे, त्यांना स्टीम घेवून खूप फायदा होतो. स्टीम घेतल्याने चेहऱ्यावर ओलावा टिकून राहतो. यासह, जर त्वचेवर सुरकुत्या असतील किंवा त्वचा सैल झाली असेल तर स्टीम ट्रीटमेंटद्वारे ते घट्ट केले जाऊ शकते.
5.चेहऱ्यावर मुरुमांची समस्या तेलाच्या ग्रंथींवर घाण जमा झाल्यामुळे होते. स्टीम घेतल्याने घाण बाहेर येते. चेहऱ्यावर मुरुम टाळण्यासाठी 5 ते 10 मिनिटे स्टीम घ्या, त्यानंतर बर्फाचा तुकड्याने मालिश करा.
6.ज्याप्रमाणे घाम आपल्या चेहऱ्यावरील विष काढून टाकतो. त्याच प्रकारे स्टीम देखील आपल्या शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी कार्य करते. स्टीम घेतल्यानंतर अर्ध्या तासांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(The tremendous benefits of taking Face Steam once a week)