कोरोनानंतर महिन्याभरानंतर केस गळतीची समस्या वाढली, कारण काय?; वाचा!

| Updated on: Jul 31, 2021 | 7:28 AM

तज्ज्ञांच्या मते कोरोना आजारातून बरे झाल्यानंतर रुग्णांमध्ये 30 दिवसानंतर केस गळतीचे प्रमाण दिसून येत आहे. काही रुग्णांमध्ये आजारपणातच केस गळती होत असल्याचं दिसून येत आहे. (There is an increasing incidence of hair loss in patients after 30 days of corona recovery)

कोरोनानंतर महिन्याभरानंतर केस गळतीची समस्या वाढली, कारण काय?; वाचा!
hair loss
Follow us on

नवी दिल्ली: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये केस गळतीची समस्या वाढत असल्याचं आढळून आलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात देणाऱ्या रुग्णांमध्ये स्किन अॅलर्जी, व्रण येणं, अशक्तपणा, थकवा, डोळे शुष्क होणं आदी लक्षणे दिसत आहेत. (There is an increasing incidence of hair loss in patients after 30 days of corona recovery)

तज्ज्ञांच्या मते कोरोना आजारातून बरे झाल्यानंतर रुग्णांमध्ये 30 दिवसानंतर केस गळतीचे प्रमाण दिसून येत आहे. काही रुग्णांमध्ये आजारपणातच केस गळती होत असल्याचं दिसून येत आहे. काही रुग्णांमध्ये पोषक तत्त्वांची कमी, ताप, तणाव, अस्वस्थता आणि हार्मोनमधील होणारे बदल यामुळे केस गळती होत असावी, असं तज्ज्ञांचं मत आहे. अशा रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. याचं कारण पोस्ट कोव्हीड इन्फ्लेमेशन आहे. वजनातील बदल, व्हिटामिन-डी आणि बी-12ची कमतरता याचं कारण असू शकतं, असं इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या डॉ. शाहीन नूरेएजदान यांनी सांगितलं.

डाएटमध्ये प्रोटीन घ्या

अशा प्रकारची केस गळती ही टेम्पररी असते. अशा परिस्थितीला टेलोजन इफ्लूवियम म्हणतात. साधारणपणे एका दिवसात 100 केस तुटतात. मात्र, अशा परिस्थितीत रोज 300 ते 400 केस तुटतात. त्यामुळे कोरोनावर मात केल्यानंतर रुग्णांनी पोषक तत्त्व घेण्याचा सल्ला दिला जातो. आहारात प्रोटीनचा अधिक समावेश केला पाहिजे, असं ज्येष्ठ कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जन डॉ. कुलदीप सिंह यांनी सांगितलं. दैनिक भास्करने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

सलग सहा दिवस केस गळती होत असेल तर

जर सलग पाच ते सहा दिवस केस गळती होत असले तर लगेच डॉक्टरांना भेटा. अशा वेळी रुग्णांना माइल्ड शॅम्पूने केस धुण्याचा सल्ला दिला जातो. केसांचा मसाज करण्यापासून ते मोठ्या कंगव्याने केस विंचरण्याचा सल्लाही दिला जात असल्याचं कुलदीप सिंह यांनी सांगितलं.

केस गळती रोखण्यासाठी हे करा

>> तणाव घेऊ नका, रोज मेडिटेशन करण्याची सवय करा
>> प्रोटीन, व्हिटामिन-डी आणि बी-12 युक्त खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा
>> हेअर स्टायलिंगसाठी केमिकल आणि हीटचा वापर करणं थांबवा
>> तरीही समस्या राहिली तर रक्तचाचणी करून पोषक तत्वांची माहिती घ्यावी (There is an increasing incidence of hair loss in patients after 30 days of corona recovery)

 

संबंधित बातम्या:

Skin Care : सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी चेहऱ्याला ‘हे’ फेसपॅक लावा!

Skin Care Tips : ग्लोइंग स्किनसाठी ‘हे’ घरगुती फेसपॅक नक्की वापरा!

Skin Care : चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी ‘हा’ फेसपॅक वापरा ! 

(There is an increasing incidence of hair loss in patients after 30 days of corona recovery)