मुंबई : स्त्रिया पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करून त्वचेतून नको असलेले केस काढून टाकतात. वॅक्सिंग, रेजर आणि इतर उपचारांच्या मदतीने शरीराचे केस काढता येतात. पण चेहऱ्यावरील केस अतिशय नाजूक असतात. हे केस काढण्यासाठी थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग केले जाऊ शकते, परंतु ते प्रभावी साधन नाही. यामुळे पुरळ, लालसरपणाची समस्या देखील होते. (These 3 home remedies are beneficial for removing unwanted hair on the skin)
अशा परिस्थितीत तुम्ही चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरगुती उपाय वापरू शकता. हे केस काढण्यास मदत करते. तसेच, त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. जर तुम्हाला देखील चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करायचे असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय केले पाहीजेत.
हळद
हळदीमध्ये नैसर्गिक गुणधर्म आहेत. हळदीमुळे आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. बेसन आणि हळद वापरून तुम्ही त्वचेवरील नको असलेले केस काढून टाकू शकता. ही एक नैसर्गिक पद्धत आहे ज्यात कोणतेही दुष्परिणाम नाहीत. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसन एक चमचा हळद आणि तीन चमचे दूध लागणार आहे. हे तीनही घटक चांगले मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 30 मिनिटे सोडा. जेव्हा हे मिश्रण पूर्णपणे सुकते तेव्हा ते काढून टाका.
अंड्याचा पांढरा भाग
अंड्यामध्ये भरपूर प्रथिने असतात. जी त्वचा घट्ट करण्यास मदत करतात. चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी अंडी फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला एका अंड्यात एक चमचा कॉर्न फ्लोअर आणि एक चमचा साखर घ्यावी लागेल. या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये ठेवा आणि त्या चांगल्या बारीक करा आणि नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. मास्क सुकल्यानंतर कोमट पाण्याने ते काढून टाका. हा मास्क लावल्याने चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर होतील.
लिंबू
लिंबूमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. हे त्वचेचे डाग हलके करण्यास मदत करते. हे त्वचेमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. यात एक्सफोलीएटर आहे जे चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्यास मदत करते. यासाठी एका वाडग्यात एक कप पाणी, दोन कप साखर आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण पाण्यात चांगले मिसळा. मिश्रण थंड झाल्यावर चेहऱ्यावर लावा. जेव्हा हे मिश्रण चांगले सुकते, तेव्हा ते कोमट पाण्याने स्वच्छ करा.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(These 3 home remedies are beneficial for removing unwanted hair on the skin)