मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये टॅनची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. टॅनमुळे आपल्या त्वचेचा रंग आणि टोन खराब होण्यास सुरूवात होते. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेला खूप नुकसान होते. त्यामुळे त्वचा टॅन होते आणि त्वचा काळी पडते. सन टॅनपासून आराम मिळवण्यासाठी लोक अनेक केमिकलयुक्त (Chemical) पदार्थांचा वापर करतात. केमिकलयुक्त गोष्टी वापरल्याने त्वचेची अधिक नुकसान होण्यास सुरूवात होते. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. विशेष म्हणजे घरगुती स्क्रब वापरल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. घरगुती स्क्रब (Homemade scrub) हे त्वचेचे अतिरिक्त तेल उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करते. चला तर मग जाणून घेऊयात घरगुती स्क्रबबद्दल अधिक.
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, दूध हे आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. दूध आणि संत्र्याच्या सालीचा स्क्रब आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. हा स्क्रब तयार करण्यासाठी एक चमचा संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये एक चमचा कच्चे दूध मिसळा. हे दोन घटक चांगले मिसळा, त्वचेवर लावा आणि काही वेळ त्वचेला मसाज करा. 10 मिनिटे त्वचेवर राहू द्या, त्यानंतर साध्या पाण्याने त्वचा धुवा. यामुळे त्वचेवरील टॅन दूर होण्यास मदत होईल.
मध आरोग्याप्रमाणेच आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर असतो. त्वचेवरील टॅन काढण्यासाठी तुम्ही मध आणि तांदळाच्या पावडरने बनवलेले स्क्रब देखील वापरू शकता. अर्धा चमचा तांदूळ पावडर एक चमचा मधात मिसळा. ते चांगले मिसळा, त्वचेला मसाज करा, कोरडे होऊ द्या. यानंतर साध्या पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील टॅन जाण्यास नक्कीच मदत होईल.
त्वचेची टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस आणि साखर यांच्यापासून तुम्ही स्क्रब तयार करून त्वचेला लावू शकता. यासाठी अर्धा चमचा साखरेत एक चमचा लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर समान प्रमाणात लावा. त्यानंतर काही वेळ मसाज करा. त्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)