Skin Care : ‘ग्रीन टी’चा त्वचेच्या काळजीसाठी या प्रकारे वापर केला जाऊ शकतो, वाचा अधिक!

| Updated on: Sep 21, 2021 | 10:34 AM

ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी जशी फायदेशीर आहे. तशीच ती आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. ग्रीन टी केस आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. ग्रीन टी अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे.

Skin Care : ग्रीन टीचा त्वचेच्या काळजीसाठी या प्रकारे वापर केला जाऊ शकतो, वाचा अधिक!
फेसपॅक
Follow us on

मुंबई : ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी जशी फायदेशीर आहे. तशीच ती आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. ग्रीन टी केस आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. ग्रीन टी अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. डोळ्यांवर आलेली सूज कमी करण्यासाठी ग्रीन टीचा वापर केला जाऊ शकतो. त्वचेसाठी ग्रीन टी कशी वापरावी हे आपण बघणार आहोत. (These 4 facepacks of green tea are extremely beneficial for the face)

ग्रीन टी आणि गुलाब पाणी

2 चमचे ग्रीन टीच्या पानांचा वापर करून एक कप ग्रीन टी तयार करा. टी तयार झाल्यावर गॅस बंद करा आणि काही वेळ थंड होऊद्या. त्यात 2 चमचे गुलाब पाणी घाला. चाळणीच्या मदतीने गाळून ते स्प्रे बाटलीमध्ये साठवा. प्रत्येक वेळी क्लीन्झरने चेहरा धुताना टोनर म्हणून वापरा.

ग्रीन टी आणि मध

ग्रीन टी तयार करा. थोडे थंड होऊ द्या. यानंतर, दोन चमचे ग्रीन टी घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि बोटांनी हलक्या हाताने मसाज करा. साध्या पाण्याने धुण्यापूर्वी 30-40 मिनिटे त्वचेवर सोडा. आपण आठवड्यातून 2-3 वेळा वापरू शकता.

ग्रीन टी आणि केळी

1 पिकलेली केळी घ्या आणि नंतर काट्याने मॅश करा. त्यात 2 चमचे ग्रीन टी घाला. मॅश केलेले केळे आणि ग्रीन टी एकत्र मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच मानेवर लावा. ते 15-20 मिनिटे सोडा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा वापरू शकता.

ग्रीन टी आणि तांदळाचे पीठ

ग्रीन टी बनवा आणि नंतर ते एका भांड्यात काढा. थंड होऊ द्या. 2 चमचे ग्रीन टीमध्ये थोडे तांदळाचे पीठ मिक्स करा. ते एकत्र मिसळा. हा पॅक संपूर्ण चेहऱ्यावर तसेच मानेवर लावा. 15-20 मिनिटांसाठी त्वचेवर सोडा. ते काढताना आधी चेहऱ्यावर थोडे पाणी शिंपडा आणि नंतर हलक्या हाताने घासून घ्या. आपण आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा वापरू शकता.

संबंधित बातम्या : 

Broccoli To Lettuce : पाच अँटीऑक्सिडंटयुक्त भाज्या ज्यांचा तुमच्या आहारात जरुर करा समावेश, मिळतील अनेक फायदे

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी कार्डिओ व्यायामाशी संबंधित या 5 सामान्य मिथकांवर कधीही विश्वास ठेवू नका!

(These 4 facepacks of green tea are extremely beneficial for the face)