मुंबई : त्वचेवरील (Skin) काळे डाग ही एक मोठी समस्या असते. त्वचेवरील हे डाग काढणे सोपे काम नाहीये. मात्र, घरगुती स्क्रबच्या मदतीने आपण चेहऱ्यावरील हे डाग नक्कीच काढू शकतो. हे काळे डाग त्वचेवर मेलॅनिनच्या जास्त उत्पादनामुळे होतात. हे डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही घरगुती स्क्रब (Scrub) देखील वापरू शकता. यामुळे डाग दूर होण्यास मदत होईल. हे स्क्रब नैसर्गिक घटक वापरून बनवले जातात. विशेष म्हणजे घरगुती स्क्रब तयार करण्यासाठी आपल्याला जास्त खर्चही अजिबात लागत नाही. या स्क्रबचे कोणते ही वाईट परिणाम (Bad results) आपल्या त्वचेवर होत नाहीत. चला तर जाणून घेऊयात हे घरगुती स्क्रब घरच्या-घरी कसे तयार करायचे.
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ओट्स आपल्या आरोग्याप्रमाणेच आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर असतात. ओट्स स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे ओट्स, 2 चमचे दूध आणि १ चमचा मध लागेल. हे सर्व घटक एकत्र करून पेस्ट बनवा, चेहऱ्यावर तसेच मानेला लावा. काही वेळ त्वचेला मसाज करा. 10 ते 15 मिनिटे असेच राहू द्या. मग मसाज करा. या खास स्क्रबमुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास मदत होईल.
चेहऱ्यावरील काळ्या डागांची समस्या दूर करण्यासाठी काॅफी पावडर देखील खूप जास्त फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला दोन चमचे काॅफी पावडर आणि चार चमचे मध लागणार आहे. काॅफी आणि मध एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.
हे स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा तांदळाचे पीठ आणि थोडे दूध लागेल. हे दोन्ही चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर आणि मानेला लावा. बोटांनी त्वचेला मसाज करा, 10 मिनिटे त्वचेवर राहू द्या, त्यानंतर ते साध्या पाण्याने धुवा. हा स्क्रब तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. तांदळाचे पीठ पिगमेंटेड आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते.
5 स्ट्रॉबेरी घ्या आणि त्या मॅश करा आणि पेस्ट बनवा. ते चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि त्वचेला काही मिनिटे मसाज करा. हे तुम्ही आठवड्यातून 3 वेळा वापरू शकता. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ते त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. ते त्वचेला एक्सफोलिएट करते.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्यान अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)