मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेची (Skin) काळजी घेणे खूप महत्वाचे असते. त्वचा स्वच्छ आणि मुलायम ठेवण्यासाठी एक्सफोलिएशन आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये जास्त घाम येतो आणि आपल्या त्वचेवरील मृत पेशी वाढण्यास सुरूवात होते. तसेच सततच्या प्रदूषकांमुळे आपली त्वचा निस्तेज, कोरडी आणि निर्जीव होते. मात्र, दरवेळी जेव्हा त्वचेच्या काळजीचा विषय ज्यावेळी येतो, तेंव्हा फक्त आपल्याला आठवण होते म्हणजे चेहऱ्याच्या त्वचेची. आपण फक्त चेहऱ्याच्या त्वचेच्या काळजी (Care) घेतो. मात्र, शरीराच्या इतर त्वचेकडून मात्र दुर्लक्ष करतो. यामुळे त्वचेच्या समस्या वाढतच जातात. त्वचेच्यास समस्या दूर करण्यासाठी तुम्ही बॉडी स्क्रब वापरू शकता, यामुळे तुमची त्वचा स्वच्छ राहते, स्वच्छ आणि चमकदार त्वचेसाठी तुम्ही होममेड बॉडी स्क्रब (Body scrub) देखील वापरू शकता. घरी उपलब्ध घटकांचा वापर करून तुम्ही ते सहज बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात घरच्या घरी कशाप्रकारे बॉडी स्क्रब तयार केले जाऊ शकते.
मसूर डाळीपासून बॉडी स्क्रब तयार केला जाऊ शकतो. या बॉडी स्क्रबमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. एक कप मसूर डाळ बारीक करून पावडर तयार करा. त्यात थोडे कच्चे दूध घाला आणि चांगले मिसळा. त्वचेवर लावा. काही वेळ मालिश करा. नंतर साध्या पाण्याने त्वचा धुवा. यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत होते.
यासाठी एक वाटी मसूर डाळ बारीक करून पावडर बनवा. त्यात साधे दही घालून चांगले मिक्स करा. याने त्वचेला काही वेळ मसाज करा. 5 ते 10 मिनिटे राहू द्या. नंतर साध्या पाण्याने धुवा. तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. यामुळे त्वचेवरील टॅन जाऊ त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
यासाठी अर्धा कप कॉफी पावडर घ्या आणि त्यामध्ये एक चमचा कोको पावडर घाला. त्यात नारळाचे दूध घालून चांगले मिसळा आणि त्वचेवर लावा. त्वचेला काही वेळ मसाज करा. नंतर साध्या पाण्याने धुवा. तुम्ही ते आठवड्यातून दोनदा वापरू शकता. यामुळे खराब त्वचा निघून जाण्यास मदत होईल.
अर्धा कप कॉफी पावडर घ्या आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार ऑलिव्ह ऑईल टाका. आता ही पेस्ट आपल्या संपूर्ण त्वचेला लावा आणि हलक्या हातांनी शरीराला मसाज करा. 5 ते 10 मिनिटे असेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा करा. यामुळे त्वचा मुलायमदार होते.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)