Skin | उन्हाळ्यात तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी हे 4 घरगुती स्क्रब अत्यंत फायदेशीर…

| Updated on: Apr 17, 2022 | 10:51 AM

कडक सूर्यप्रकाश आणि घामामुळे त्वचा (Skin) निस्तेज होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्वचेवर घाण आणि टॅन जमा होतो. आपल्या त्वचेवरील मृत पेशी काढण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. विशेष म्हणजे या टिप्स फाॅलो करण्यासाठी तुम्हाला काही खर्च देखील लागणार नाही. मृत पेशी काढण्यासाठी स्क्रब (Scrub) अत्यंत फायदेशीर असतात.

Skin | उन्हाळ्यात तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी हे 4 घरगुती स्क्रब अत्यंत फायदेशीर...
हे स्क्रब त्वचेसाठी फायदेशीर
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : कडक सूर्यप्रकाश आणि घामामुळे त्वचा (Skin) निस्तेज होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्वचेवर घाण आणि टॅन जमा होतो. आपल्या त्वचेवरील मृत पेशी काढण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. विशेष म्हणजे या टिप्स फाॅलो करण्यासाठी तुम्हाला काही खर्च देखील लागणार नाही. मृत पेशी काढण्यासाठी स्क्रब (Scrub) अत्यंत फायदेशीर असतात. ते छिद्र स्वच्छ करण्याचे काम करतात, ते ब्लॅकहेड्स आणि पिंपल्सचा समस्याही दूर करण्यास मदत करतात. उन्हाळ्यात तुम्ही मुलतानी माती, गुलाब पाणी, चंदन, काकडी आणि कोरफड (Aloevera) यांसारख्या घटकांचा वापर करून घरगुती स्क्रब बनवू शकता. हे स्क्रब उन्हाळ्यात तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी काम करतात. चला तर मग हे स्क्रब घरी कसे तयार करायचे याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

अंडे आणि ओट्स

हा खास स्क्रब घरी तयार करण्यासाठी अंड्यामध्ये ओट्स मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट चांगली मिक्स झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यासह मानेवर लावा. कोरडे होईपर्यंत राहू द्या. त्यानंतर चेहऱ्यावर थोडा वेळ मसाज करत काढा. थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. या स्क्रबमुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.

बदाम आणि हळद

बदाम आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेसाठीही खूप जास्त फायदेशीर आहे. बदाम बारीक करून पावडर बनवा, त्यात दही घाला, त्यात थोडी हळद घाला आणि चांगले मिक्स करून हे त्वचेवर लावा. दहा मिनिटांनंतर चेहऱ्याचा मसाज करा. नंतर पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील टॅन दूर होण्यास मदत होते.

तांदळाचे पीठ आणि बेसन

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, तांदळाचे पीठ हे आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. हा स्क्रब तयार करण्यासाठी 1 चमचा तांदूळ पावडर आणि 2 चमचे बेसन मिक्स करून त्यात थोडे दही आणि हळद घाला. ते चांगले मिसळा. ते त्वचेवर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर मसाज करत, थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.

पपई आणि ओट्स

पपईमध्ये पपईन नावाचे एन्झाइम असते, ते त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्याचे काम करते. ते त्वचा चमकदार बनवण्यास मदत करते. यासाठी पपईमध्ये ओट्स आणि दही घालून चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही संपूर्ण पेस्ट आपल्या चेहऱ्यावर वीस मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या :

Weight Loss Tips : वजन कमी करायचे आहे? मग फक्त या 5 टिप्स फाॅलो करा!

Salt intake tips : जेवणात मीठ कमी केल्याने आरोग्याला हे फायदे होतात, वाचा सविस्तरपणे!