मुंबई : आपल्या खराब जीवनशैलीचा परिणाम फक्त आरोग्यावरच नाहीतर आपल्या चेहऱ्यावर देखील होतो. वाढत्या वयानुसार त्वचेवर वृद्धत्वाची चिन्हे दिसणे सामान्य आहे. परंतु जर त्वचेची वेळीच काळजी घेतली गेली नाही तर वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसू लागतात. गेल्या काही वर्षांमध्ये आयुर्वेदाची लोकप्रियता खूप वाढली आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील आयुर्वेदीक गोष्टी वापरल्या जात आहेत. जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. (These 4 things are beneficial for reducing the symptoms of skin aging)
मोरिंगा
मोरिंगा त्वचेमध्ये वृद्धत्व विरोधी एजंट म्हणून काम करते. त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. याचा उपयोग त्वचेवरील पुरळ, डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी केला जातो. वृद्धत्वाच्या खुणा दूर करण्यासाठी चेहऱ्यावर मोरिंगाचा फेस पॅक लावा. हे त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते.
अश्वगंधा
अश्वगंधा ही वनस्पती आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी अश्वगंधा खूप फायदेशीर आहे. अश्वगंधा मृत त्वचा काढून त्वचेला सुंदर ठेवते. यामुळे तुमची त्वचा ताजी आणि चमकदार दिसते. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुध अश्वगंधा आणि सुका मेवा मिसळून पिणे फायदेशीर आहे. हे त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करते.
कडुलिंब
कडुनिंबामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त, यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत होते. त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी कडुलिंबाच्या तेलात नारळाचे तेल मिसळून त्वचेवर मसाज करा. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.
आवळा
आवळा अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मध्ये समृद्ध आहे. हे तुमच्या त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवते. आवळा वापरल्याने त्वचेच्या समस्या दूर होऊ शकतात. या व्यतिरिक्त हे वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास देखील मदत करते. त्वचेला चमकदार ठेवण्यासाठी रोज सकाळी एक ग्लास आवळा रस प्या.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(These 4 things are beneficial for reducing the symptoms of skin aging)