मुंबई : डोक्यातील कोंडा ही केसांच्या सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे. आपल्यापैकी काहीजण कोंडाच्या समस्येने ग्रस्त आहेत. डोक्यातील कोंडा जास्त प्रमाणात झाल्यावर त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो. डोक्यातील कोंड्यामुळे केसांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात जसे की केस अकाली पांढरे होणे, केस गळणे, कोरडे होणे आणि केस तुटणे इ. केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. (These effective home remedies can help in get rid of dandruff)
अॅपल सायडर व्हिनेगर आणि पाणी – आपले केस ओले करा आणि अर्धा कप अॅपल सायडर व्हिनेगर आणि पाणी घ्या आणि ते एकत्र करा. ते ओल्या केसांवर आणि टाळूवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. 20 मिनिटे सोडा आणि पाण्याने धुवा. डोक्यातील कोंड्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हे करू शकतात.
अॅपल सायडर व्हिनेगर आणि दही – अर्धा कप दही घ्या आणि त्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर घाला. ते एकत्र मिसळा. केसांना शॅम्पू करा आणि नंतर हे मिश्रण ओल्या टाळूवर लावा. डोक्यावर मसाज करा आणि 15 मिनिटे सोडा. त्यानंतर थंड पाण्याने धुवा. अॅपल सायडर व्हिनेगरमुळे कोंड्याची समस्या दूर होऊ शकते. दही कोंड्यावर आणखी एक उत्तम उपाय आहे. दहीमधील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म कोंड्यावर उपचार करण्यास मदत करतात.
अॅपल सायडर व्हिनेगर आणि बेकिंग सोडा – बेकिंग सोडा आणि अॅपल सायडर व्हिनेगर पुरेशा प्रमाणात मिसळून पेस्ट बनवा. टाळूवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. काही मिनिटांसाठी ते सोडा आणि नंतर साध्या थंड पाण्याने धुवा. आपण आठवड्यातून दोनदा त्याचा वापर करू शकता. बेकिंग सोडा एक उत्तम नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे. हे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. बेकिंग सोडा टाळूचे पीएच स्तर राखण्यासाठी देखील प्रभावी आहे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health | वाढत्या वयासह शरीराला व्हिटामिनची गरज, अन्यथा गंभीर आजारांची शक्यता!https://t.co/1DN3A5Xg5M#vitamins #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 10, 2020
(These effective home remedies can help in get rid of dandruff)